पाचोरा औद्योगिक वसाहत निवडणुकीत सहकार पॅनल विजयी

0

पाचोरा। येथील सहकारी औद्योगिक वसाहतीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीचा निकाल रविवारी 4 रोजी जाहीर झाला. या निवडणुकीत सहकार पॅनलने एकतर्फी विजय मिळविला. सहकार पॅनलचे प्रतिस्पर्धी असलेले भागचंद राका यांच्या पॅनलला तीन पैकी एक जागेवर समाधान मानावे लागले.

निवडणुकीत 165 पैकी 109 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत इतर मागासवर्गीय मतदार संघातुन साहेबराव गजमल पाटील व अनुसुचित जाती-जमाती मतदार संघातुन मंजुळा देविंचद ब्रम्हे यांची बिनविरोध घोषित करण्यात आले होते. उर्वरित कारखानदार मतदार संघात विमुक्त जाती-भटक्या जाती मतदार संघात एका जागेसाठी दोन उमेदवार निवडणुक रिंगणात होते. आदित्यकुमार जगदिशप्रसाद बाजोरिया (90), दत्तात्रय एकनाथ जडे (79), विजयकुमार भिकमचंद जैन (84), पुनमचंद रामानंद मोर (91), दिलीप मुकुंदराव पाटील (85), अशोककुमार हरकचंद संघवी (78), व भुषण (सनी) दिलीप वाघ (87) तर महिला मतदार संघातुन अ‍ॅड. पुजा भागचंद राका (67), अनिता अनिल संघवी (63), रेखा पुष्पेंद्र माथुरवैश्य (62), शैलेंद्रसिंग कर्णसिंग पाटील (74) हे विजयी झाले. तर उमेशकुमार भागचंद राका (56), विक्रांत किशोर पेंढारकर (31) हे उमेदवार पराभुत झाले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून बी.व्ही. पाटील, एस बी. पाटील, अनिल वाघ यांनी काम पाहिले.