पाचोरा । पाचोरा कृउबात शासकीय हमी भावाने मका, ज्वारी, बाजरी खरेदी केंद्राचे काटापूजन आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आले. यावेळी तहसीलदार कापसे, मार्केट कमेटी संचालक दिनकर देवरे, जि.प.सदस्य पदमसिंग राजपूत, गणेश पाटील, रमेश तात्या, मनोज पाटील, सचिव बोरुडे, शेतकीसंघाचे भावसार, गोडावून कीपर यांची उपस्थिती होती. यावेळी दिनकर देवरे खरेदी संदर्भात प्रास्ताविक केले. तसेच तहसीलदार कापसे मार्गदर्शन केले.
शेतकर्यांनी लाभ घ्यावे
शेतकर्यांनी लाभ घेण्याचे आवाहन आमदार किशोर पाटील यांनी शासकीय हमीदराने मका, ज्वारी, बाजरी, खरेदी होणार असून 31 डिसेंबरपर्यंत शेतकर्यांनी ओनलाईन पद्धतीने शेतकीसह संघ पाचोरा येथे नाव नोंदणी करावी. यासाठी मका पेरा असलेला 7/12 उतारा, आधार कार्ड, व बँकेचे पासबुकची झेरॉक्स देऊन 14 टक्के पेक्षा कमी आद्रता असलेला मका 1425 दराने शासन खरेदी करणार आहे. याचा लाभ जास्तीत जास्त शेतकर्यांनी घ्यावा परंतु याबरोबरच व्यापारी वर्गाने खरेदी केलेला मका खरेदी होणार नाही याची दक्षता यंत्रणेणे घ्यावी असे सांगून बोंडअळीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवासाठी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून प्रति क्विंटल हजार प्रमाणे शेतकर्यांना बोनस मिळवून देणार असल्याचे नमूद केले.