पाचोरा कृउबाच्या भुखंड विक्रीबाबत पुढील निर्णय २८ रोजी

0

पाचोरा – पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या विक्रीच्या नाशिक सहनिबंधक यांच्या कार्यालयात पुढील २८ जानेवारी २०१९ रोजीची मिळाली आहे. पाचोरा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या भुखंड विक्री प्रकरणी जळगाव पिपल्स बॅंकेने काढलेले ७० हजार स्क्वेअरफुट जमीन लिलाव प्रकीयेला नाशिक सहनिबंधक मिलींद भालेराव यांनी ‘जैसे थे’चा आदेश केला आहे. ८ जानेवारी रोजी या प्रकरणी सुनावणीचे कामकाज होणार होते. मात्र ही सुनावणी आता २८ जानेवारी रोजी होणार आहे.

यावेळी तारखेला सचिन सोमवंशी, कृउबा संचालक दत्ता पाटील, नरेंद्र पाटील, सुनंदाताई बोरसे, दिलीप पाटील, सचिव बी.बी.बोरुडे यांनी उपस्थिती दिली आहे. पाचोरा-भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळाचा प्रश्न असलेली भुखंड विक्री होत आहे. तर बँक प्रशासन हमशाहीने शेतकर्‍यांच्या घामाची जागेचा लिलाव कवडीमोल भावाने करत आहे. तर हा लिलाव घेण्यासाठी शहरातील काही व्यापारी जे नेहमी सेटींगने जमीनी विकत घेतात ते तोंडघशी पडले आहे.