पाचोरा । भडगाव-पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदाची निवडणुक शुक्रवारी 21 रोजी घेण्यात आली. कृषी उत्पन्न बाजार समितीवर तिसर्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य उध्दव दत्तु मराठे यांची निवड सभापतीपदी झाली आहे. तर उपसभापतीपदी संजय सिसोदीया यांची निवड झाली आहेे. मंगेश राजपुत व विश्वास पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर ही निवडणुक झाली होती.
कृउबात शिवसेनेचे 10, भाजपा-राष्ट्रवादीचे 8 सदस्य आहेत. अॅड.विश्वास भोसले, सतिष शिंदे यांचा तिसर्यांदा पराभव झाला आहे. भाजपा-राष्ट्रवादीच्या आघाडीला बाजार समितीच्या निवडणुकीत तिसर्यांदा पराभव पत्करावा लागला आहे. आमदार किशोर पाटील यांचे पुन्हा वर्चस्व सिध्द झाले आहे. शिवसेनेच्या विजयासाठी अॅड.दिनकर देवरे, दिपक राजपुत, किशोर बारावकर यांच्यासह शिवसैनिकांनी परिश्रम घेतले. निवड घोषीत झाल्यानंतर फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. विजयी उमेदवाराचे अभिनंदन आमदार किशोर पाटील यांनी केले.