पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीचे पाच संचालक अपात्र

0
कर्ज प्रकरण भोवले ; विरोधकांनी केली होती तक्रार
पाचोरा : पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीतील अंतर्गत विकास कामांसाठी जळगाव पीपल्स बँकेकडून अडीच कोटींची रक्कम घेऊनही ती वेळेत फेडली न गेल्याने व्याजासह ही रक्कम सुमारे पाच कोटींपर्यंत पोहोचली होती. या प्रकरणी 15 संचालकांवर जवाबदारी निश्‍चित केल्यानंतर त्यांच्याकडून रक्कम वसुल करण्यासंदर्भात सहकार आयुक्तांनी जवाबदारी निश्‍चित केली होती मात्र सत्ताधार्‍यांनी ही रक्कम फेडण्यासाठी मार्केट कमेटीची भाजीपाला विक्रीची जागा विकण्याचा घाट घातला असताना विरोधी गटाचे गटनेते सतीश शिंदे यांच्यासह पाच संचालकांनी तक्रार केल्यानंतर जिल्हा उपनिबंधक (सहकार संस्था) विशाल जाधवर यांनी पाच संचालकांना अपात्र केले आहे. अपात्र झालेल्या संचालकांमध्ये विकास पाटील, प्रताप हरी पाटील,  विश्‍वास वामन पाटील,  मंगेश पाटील, पंढरीनाथ पाटील आदींचा समावेश आहे.