पाचोरा येथील गाळे लिलावाला तात्पुरती स्थगिती

0

पाचोरा- ( प्रतिनिधी ): गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असलेल्या पाचोरा नगरपरिषदेच्या भाजीपाला मार्केट जागेवरील बांधलेल्या व्यापारी संकुलातील संभ्रमित गाळे लिलाव प्रक्रियेला अखेर जिल्हाधिकारी यांनी आज दि. ३ नोव्हेंबर २०२० रोजी याबाबतीत आर्थिक व्यवहारावर निर्बंध घालनारे आदेश पारित केले आहे.

भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी दिनांक २२ ऑक्टोबर २०२० रोजी महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ३०८ नुसार तक्रार दाखल केली होती.सदर व्यापारी संकुलात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर कामे झाली असून,सदर बांधकाम पूर्ण होऊन विकासकाकडुन हस्तांतरित न करून घेता,इलेक्ट्रिक फिटिंग, इलेक्ट्रिक मीटर, लिफ्ट,संपूर्ण संकुलाला अग्निशमन सुरक्षा कायद्या नुसार संपूर्ण संकुलात अग्निशमन यंत्रणा व इतर अनुषंगिक बाबी इ. कुठलीही व्यवस्था पूर्णत्वास आलेले दिसून येत नव्हते,

त्यासोबतच बेकायदेशीररित्या लिलावप्रक्रिया राबवून सामान्य नागरिक व व्यापारी यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असून ही संपूर्ण प्रक्रिया संभ्रमात पाडणारी असल्याने त्यात कुठलीही बाब स्पष्ट नसून या सर्व बाबींची पूर्तता करूनच लिलाव करावा आणि गाळ्यांचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत व्यापारी व सामान्य नागरिकांकडुन कुठलीही रक्कम त्यांच्याकडून स्वीकारू नये ज्यावेळी व्यापारी संकुलाचे काम पूर्णपणे पूर्णत्वास येईल त्यावेळी गाळे हस्तांतरित करताना व्यापारी व सामान्य जनतेकडून पैसे घ्यावेत अशीही मागणी अमोल शिंदे यांनी या तक्रार अर्जात केली होती.