Murderous father sexually assaults his own minor daughter: Accused father arrested in Pachora taluka पाचोरा : बाप-बेटीच्या पवित्र नात्याला पाचोरा तालुक्यातील नराधम पित्याने कलंक लावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणार्या पित्याला पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केली.
मुलीला दाखवले अश्लील व्हिडिओ
तक्रारीनुसार, नराधम पित्याने आपल्या 15 वर्षीय मुलीला मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवायचा तसेच तिच्यासोबत अश्लील चाळे करायचा. हा किळसवाना प्रकार मागील तीन वर्षापासून पासून सुरु होता. नराधम बाप मुलीला तुझ्या आईला घराबाहेर काढून देईल, अशी धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी अन्याय सहन करत होती परंतु मागील काही दिवसांपासून प्रकार वाढल्यामुळे पीडीत मुलीने शेवटी आईला सर्व घटना सांगितली. आईने आपल्या भावांना सर्व घटना सांगितली. त्यानंतर मंगळवारी रात्री याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.