पाचोरा : लग्नाचे आमिष दाखवून चुलत दिरानेच 24 वर्षीय वहिनीवर वारंवार बलात्कार केल्याची धक्कादायक उघडकीस आली आहे. पाचोरा तालुक्यातील एका गावातील 24 वर्षीय विधवा महिलेवर आरोपी दिराने अत्याचार करण्यासोबतच 73 लाख 64 हजार 501 रुपये व सोन्याचे दागिनेही घेऊन फसवणूक केल्याचा आरोप असून या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पतीच्या निधनानंतर लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार
पाचोरा तालुक्यातील एका गावातील 24 वर्षीय महिलेच्या आय.टी.अभियंता असलेल्या पतीचे सन 2020 मध्ये कोरोनाने निधन झाले. पतीच्या मुत्यूनंतर चुलत दीर आणि सासू-सासर्याने फसवणूक करण्याचा कट रचत संगनमताने महिलेच्या आई-वडिलांकडे जावु न देता लग्नाचे आमिष दाखविले. पीडीतेने लग्नानंतर शारीरीक संबंध ठेवू, अशी भूमिका घेतली मात्र त्यानंतरही आरोपीने वेळोवेळी शारीरीक संबंध ठेवले व लग्नाची विचारणा केल्यानंतर लग्न करण्यास नकार दिला.
74 लाखांचे दागिने हडपले
संशयीत आरोपी तथा चुलत सासरे व दिर अशा तिघांनी मिळून महिलेचा विश्वास संपादन करीत विविध बहाण्याने महिलेच्या पतीच्या खात्यातील 73 लाख 64 हजार 501 रुपयांची रक्कम वळती करून घेतली तसेच महिलेच्या मुलीचे 112 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने सुद्धा ठेवून घेतले. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत.