अखिल भारतिय ग्रामिण पञकार संघ, निर्भय लोकसंवाद फाउंडेशन, व जनता सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांची मागणी
पाचोरा:- कोरोना आजाराच्या आपात्कालीन परिस्थितीत जीवनावश्यक किराणा वस्तू, भाजीपाला व मास्क सेनेटाईझर जादा दराने विक्री करणार्यांवर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी
अखिल भारतिय ग्रामिण पञकार संघ, निर्भय लोकसंवाद फाउंडेशन, व जनता सामाजिक बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न नागरी पुरवठा मंत्री सह प्रांताधिकारी राजेंद्र कचरे,तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले आहे.
सद्या कोरोना आजाराच्या आपात्कालीन परिस्थितीत देशभरात लाॅकडाउन आहे. या काळात सरकारने जनतेची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक किराणा, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ, मेडिकल आणि प्राथमिक उपचारासाठी सुविधा दिल्या आहेत. प्रशासन जिवनावश्यक वस्तु मुबलक मिळेल असे आवाहन करीत आहे. मात्र पाचोरा शहर व तालुक्यात दुकानदार आपल्याकडे असलेल्या जिवनावशक वस्तुंची साठवणूक करून बाजार भावापेक्षा जास्त दराने विक्री करून काळाबाजार करित आहे. लाखो रुपये फर्निचर वर खर्च करणाऱ्या किराणा दुकानदार किंवा मोठ्या मॉल मध्ये नियमानुसार किराणा दुकानाचे नाव, परवाना क्रमांक, जीएसटी क्रमांक, दैनंदिन बाजारभाव आणि मालकाचे नाव असलेला फलक लावणे बंधनकारक आहे.परंतु तालुक्यात कोणत्याही किराणा दुकाने मॉल अथवा दूध डेअरी व अन्य सर्व प्रकारच्या व्यावसाईकांच्या दुकानांवर फलक दिसून येत नाही. शासनाच्या नियमांची पायमल्ली करणारा प्रकार आहे. आपात्कालीन परिस्थितीत किराणा दुकानदार सर्वसामान्य व गोरगरिब जनतेची जीवनावश्यक वस्तूंची निर्धारित किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करून आर्थिक लूट करीत असल्याच्या तक्रारी जनतेतून दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच भाजीपाला आणि आजाराची लागण टाळण्यासाठी मेडिकल वर मास्क व सेनेटाईझर जास्त दराने विक्री करीत आहे. या बिकट परिस्थितीत जनता आर्थिक भरडली जात आहे. दिलेल्या निवेदनाची गांभीर्य पूर्वक दखल घेऊन जनतेची आर्थिक लूट करणाऱ्या प्रकारांवर आळा घालणे काळाची गरज आहे. नियमानुसार सर्व दुकानदारांना दैनंदिन भावफलक लावणे सक्ती करावी. जेणे करून ग्राहकांची आर्थिक लूट होणार नाही. ज्यादा दराने जीवनावश्यक वस्तू विक्री करणार्यावर कठोर कार्यवाही करावी असे निवेदन अ.भा.ग्रा.प.संघाचे प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण सुर्यवंशी, निर्भय लोकसंवाद संस्थापक अध्यक्ष अॅड .अभय पाटील, जिल्हा सल्लागार मिलिंद सोनवणे,विभागीय अध्यक्ष गणेश शिंदे, तालुकाध्यक्ष धनराज पाटील, श्यामकांत सराफ, माजी शहराध्यक्ष प्रशांत येवले, शहराध्यक्ष बक्षाराम नोतवाणी यांनी दिले आहे.