पाचोरा। न्यायालयाच्या आदेशानुसार 1 एप्रिलपासून दारू, वाईन शॉप व बियर बार बंद करण्याचे आदेश देण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर व्यसनाच्या आहारी गलेले नागरीक आता अवैध रित्या एमआरपी पेक्षा अधिक किंमतीत बनावट दारूची विक्री मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. तसेच संबंधिक अधिकार्यांना चिरीमिरी देवून अवैधरित्या दारू गावागावात व्रिकी होत असल्याची ओरड नागरकांमधून होत आहे. दारूची दुकाने त्वरीत बंद करावी अशीही मागणी नागरीकांना निवेदनाद्वारे केली आहे.
एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री
सध्या तालुक्यातील खेडे गावांमध्ये विविध प्रकारच्या मद्याचा साठा व महापूर दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गवरील धाब्यांवर बंदी आल्यापासून मोठ्या प्रमाणावर अवैध रीतीने करणार्या देशी, बियर शॉपी, बार तसेच बनावट दारूचा उच्छाद मांडला आहे. बियर बारच्या हॉटेल व बंदी झाल्याने अनेक व्यसनाधीन नागरीक सद्या बनावट दारूसह अनेक कंपन्यांच्या मद्य प्राशन करीत असलेले चित्र शहरासह तालुक्यातहील खेडोपाडी पहायास मिळत आहे.
पाचोरा शहरातील शिवाजी चौकातील नामांकित बियर शॉप चालकांनी याचाच फायदा घेऊन एमआरपी पेक्षा जास्तीच्या बनावट दारूची विक्री करीत असल्याचे दिसत आहेत. तसेच या दुकान दाराच्यासमोर भर रस्त्यावर वाहनांची पार्कींग होत असून शिवाजी चौकात होणार्या रहदारीमुळे एखाद्यास जीवीत हानीही होवू शकते तरीह शहरातील पोलिस कर्मचारी याकडे जाणून बजून दुर्लक्ष करत आहे. तसेच शहरासह तालुक्यात परवाना नसलेल्या ठिकाणीही सर्रास मद्य विक्रीही होत आहे. तर काही ठिकाणी बनावट लेबल तयार करून बनावट दारूची विकली जाते.
परवाना नसतांनाही सर्रास विक्री
शॉपी असो कि सोडाच्या टपर्या सध्या सगळीकडेच मद्य विक्रेत्यांचे जाळे पसरले आहे. मद्य शैाकीनांकडून कुठेही मद्य मिळावे अशी सुविधा संबंधीत अधिकारी काही अर्थिक फायदा घेवन दारू व बियर विकर्त्यावर संबंधित अधिकारी कुठल्याही दुकानची चौकशी न करता दुकान चालकाकडून महिन्याला संबंधीत व्यापार्याकडून हस्तगत करीत असल्याची भूमिका बजावत असतात. याकडे राज्य उत्पादन शुल्क व जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी केली आहे.