पाचोरा तालुक्यात रस्त्यांसह पुलांच्या दुरुस्तीसाठी 9 कोटींचा निधी मंजूर

प्रशासकीय मान्यता प्राप्त
पाचोरा। पाचोरा-भडगाव तालुक्यातील रस्त्यांसह पुलांची पूरहानी दुरुस्तीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या दालनात आ.किशोर पाटील यांनी सादर करून गांभीर्याने चर्चा केली. मंत्री अशोक चव्हाण यांनी तातडीने 5 मार्च 2021 रोजी बैठक घेऊन रस्ते व पुलांच्या दुरुस्तीच्या प्रस्तावाची दखल घेऊन 9 कोटी रुपये निधी मंजूर करून दिला. त्यासाठी प्रशासकीय मान्यताही प्राप्त झाली आहे.

आ.किशोर पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्या दालनात रस्त्यांसह पुलांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव सादर करून वारंवार भेटी घेऊन रस्ते व पुलांची झालेली दूरवस्था गांभीर्याने लक्षात आणून दिली. त्यांनीही तातडीने दखल घेऊन रस्ते व पुलांच्या दुरुस्तीसाठीच्या 9 कोटी रुपयांचा मंजुरी दिली. विकास कामांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आदेशान्वये जळगावचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यांने निधी उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे जनतेतून समाधान व्यक्त होत आहे.

विकास कामांमध्ये प्रामुख्याने शेवाळे गावाजवळील पुलाची पूरहानी दुरुस्तीसाठी 130 लाख रुपये, शिंदाड गावाजवळील पुलाची पूरहानी दुरुस्तीसाठी 130 लाख रुपये, वरखेडी, भोजे पिंपळगाव व रास्ता प्रजिमा 36 किमी 13/00 मधील रस्त्याची पूरहानी दुरुस्तीसाठी 180 लाख रुपये, पाचोरा-वरखेडी पहूर रस्ता रामा 19 किमी 197/600 मधील रस्त्याची पूरहानी दुरुस्तीसाठी 47 लाख रुपये, पाचोरा-वरखेडी-पहूर रस्ता रामा 19 किमी 197/900 मधील रस्त्याची पूरहानी दुरुस्तीसाठी 68 लाख रुपये, पाचोरा-वरखेडी-पहूर रस्ता रामा 19 किमी 200/400 मधील रस्त्याची पूरहानी दुरुस्तीसाठी 60 लाख रुपये, पाचोरा-वरखेडी-पहूर रस्ता रामा 19 किमी 192/00 ते 193/500 मधील रस्त्याची पुरहानी दुरुस्तीसाठी 64 लाख रुपये, पाचोरा वाडी सातगाव रास्ता रामा 40 किमी 101/00 ते 102/500 पुरहानी दुरुस्तीसाठी 56 लाख रुपये, कजगाव नागद रस्ता रामा 39 किमी 60/500 ते 63/500 मधील पुरहानी दुरुस्तीसाठी 68 लाख रुपये, नगरदेवळा-खडकदेवळा-पिंपळगाव रामा 17 रस्ता किमी 94/00 मधील पुलाची पुरहानी दुरुस्तीसाठी 30 लाख रुपये, पाचोरा-वरखेडी-पहूर रस्ता रामा 19 किमी 194/400 मधील रस्त्यावरील पुलाची पूरहानी दुरुस्तीसाठी 30 लाख रुपये, कजगाव-नागद रस्ता रामा 39 किमी 68/200 मधील वडगाव मुलाणे गावाजवळील पुलाची पूरहानी दुरुस्तीसाठी 30 लाख रुपये, ओझर-खडकडेवळा रामा 38 किमी 8/00 मधील पुलाची पूरहानी दुरुस्तीसाठी 17 लाख रुपये, नेरी भामरे रस्ता प्रजिमा 56 किमी 3/56 मधील पुलाची पूरहानी दुरुस्तीसाठी 26 लाख रुपये, पाचोरा येथील शासकीय इमारतींची दुरुस्तीसाठी 23 लाख रुपये असा 9 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.