पाचोरा । पाचोरा वनपरीक्षेत्र अंर्तगत प्रचंड मोठ्या प्रमाणावर अवैक्ष वृक्षतोड पावसाळ्यात देखील सुरुच आहे. रोज ग्रामीण भागातून 10 ते 15 टॅ्रक्टर लाकडांनी भरुन पाचोरा शहराच्या मध्यभागी असलेल्या सुपडू भाटू शाळेजवळ असलेल्या वखारीमध्ये दाखल होतात. त्या ठिकाणी लहान मुलांची प्राथमिक शाळा आहे. भरवस्तीत पाचोर्यात वखारी सुरु आहेत तेथील रहिवाशांना या वखारीमुळे प्रदूषणाचा त्रास्त होतो. परंतु राजकीय वरदहस्त असल्यामुळे प्रकरण दडपले जाते. अशी दबक्या आवाजात चर्चा आहे. पाचोरा वनपरीक्षेत्र अधिकारी गणेश पाटील व त्यांचे नाकेदार श्री काळे यांच्या मेहरबानीने सरसिपणे लाकडाची रात्री व भल्या पहाटे चोरट्या मार्गाने वाहतूक केली जाते. जारगांव चौफुलीवरील ए-वन काट्यावर वजन केले जाते त्यानंतर ते ट्रॅक्टर मोजमापास जाते. तसेच वखारीमध्ये देखील एक नामांकीत व्यापार्याची जीन आहे. ती जीन व्यापार्यांनी लाकडाचा साठा लपविण्यसाठी भाड्याने घेतली आहे.
वरदहस्त असल्यामुळे प्रकरण दडपल्याची चर्चा
‘सावा जीन’ म्हणून ती परिचीत आहे. त्या जीनमध्ये अवैधपणे लाकडाने भरलेला माल लपवला जातो. कमीतकमी 4 महीने पुरेल इतका लाकडाचा साठा येथे लपवला जातो. याकडे वनविभागाचे डि.एफ.ओ वनसंरक्षक लक्ष देतील का? वास्तविक पहाता लाकुड तोडीचा पास हा प्रांत-अधिकारी देतात. त्यासाठी कमीत-कमी 1 महिना लागातो मग या सर्व अवैध लाकुड वाल्यांकडे पास आहेत का? वनविभागाचे नाकेदार काळे यांची जबाबदारी असते आवक/जावक वखारीतून येणारा व जाणारा परंतु नाकेदार सॉमिल मालक व्यापारी यांची छुपी युती असते. त्यामुळे यांना व्यापार्यांना अभय मिळते. शासन मात्र शतकोटी वृक्ष लगवडीचा संकल्प करते इकडे मात्र शासनाचे अधिकारीच भ्रष्ट मार्गाने सर्रासपणे वृक्ष तोड करतात. कुंपणच शेण-खाते तेव्हा इतरांचे काय? पाचोर्याचे प्रांताधिकारी मनिषा खत्री याकडे लक्ष देऊन अवैघ लाकडाचा साठा यावर कारवाई करतील का? अशी चर्चा नागरीकांमध्ये सुरू आहे.