पाचोरा । विधान परिषदेच्या आमदार स्मिता वाघ त्यांचे उबानदार निधीतून पाचोरा तालुक्यातील गावांच्या विकासाकरीता 2 कोटींचा 25/15 ची कामे मंजूर करुन दिली. या निधीतील 5 गावांना भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले.
विधान परिषद आमदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नातून भातखंडे खुर्द येथे रस्ते कॉकीटीकरण व भुमिगत गटारी साठी(6 लाख), अंतुर्ली खुर्द रंगमंच, भुमिगत गटार व रस्ते कॉकीटकरण (12 लाख) स्मशानभूमीला जोेडणारा रस्ता, भुमिगत गटार (6 लाख) पुनगाम कॉक्रीटकरण, अंतुर्ली खुर्द, रस्ते काँक्रिटीकरण ह्या 5 गावांना भाजपा जिल्हाध्यक्ष यांचे प्रमुख उपस्थितीत विविध विकास कामांची उद्घाटन करण्यात आली. यावेळी जिल्हा सरचिटणीस सदाशिव पाटील, सभापती सुभाष पाटील, राज्य परिषद सदस्य डि.एम.पाटील, जि.प.सदस्य मधूकाटे, शहराध्यक्ष नंदु सेामवंशी, तालुका सरचिटणीस प्रदिप पाटील यांच्यासह ग्रामस्थ व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.