पाचोरा तालुक्यात ६२ गावांमधे भिषण पाणी टंचाई

0

तहान भागविण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न

पाचोरा- पाचोरा तालुक्यात १२६ पैकी १०६ गावांचा पाणी टंचाईच्या आराखड्यात समावेश करण्यात आला आहे. यापैकी गिरणा, हिवरा, बहुळा अग्नावती थडीजवळील गावे वगळता ६२ गावातील नागरिक भिषण पाणी टंचाईशी सामना करावा लागत आहे, अनेक गावातील नळाच्या तोड्यांना महिना-दिडमहीन्या पासून पाणीच न आल्याने नागरीक, टँकर, बैलगाडी, रिक्शा, मोटारसायकल, व डोक्यावर मिळेल त्या ठिकाणी जावून पाणी आणून तहान भागवित आहेत. निंभोरी येथील पिण्याचे पाणी घेवून जात असतांना रिक्षाचा अपघात झाल्याने संगीता अशोक पाटील व भाऊसाहेब गुलाबराव देशमुख या दोघांचे पाय कापावे लागल्याने त्यांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. तालुक्यात उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार कैलास चावडे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, ग्रामीण पाणीपुरवठा उपाभियंता साहेबराव पवार हे प्रयत्न करुन पाणी टंचाईसाठी विविध योजना राबवून टंचाईशी सामना करीत आहेत.

सरासरी पेक्षा कमी पाऊस
पाचोरा तालुक्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला यामुळे एकही प्रकल्प ओअरफ्लो झाला नव्हता. तालुक्यातील लहान-मोठ्या चाळीसगाव प्रकल्पांपैकी हिवरा, अग्नवती, दिघी, कोल्हे, लोहारा, बांबरुड, प्रकल्पात अल्पशा प्रमाणात पाणी साचले होते. मात्र पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासनाला अपयश आल्याने मोठया प्रमाणात पाण्याची चोरी होवून तालुक्यात जानेवारीपासून पाणी टंचाईला सुरवात झाली. पाणी टंचाईला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाकडून २० गावात विहीरी खोलीकरण करणे, आडवे बोर करणे, १९ गावांसाठी विहीरी अधिग्रहित करणे, ५ गावात नवीन विंधन विहिरी, १३ गावात तात्पूरती नळ योजना, ४ गावात टँकर सुरू करुन एका गावात कचपनलीका दुरुस्थिचे काम करुन पाणी टंचाईला सामोरे जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.

विहीरी खोलीकरण व आडवे बोर करण्याचे काम सुरू
तालुक्यातील चिंचखेडा खुर्द, गाळण बुद्रुक, गाळण खुर्द, घुसर्डी, ख्डकदेवळा बुद्रुक, लासुरे, लोहारी बुद्रुक, नाचणखेडा, नाईकनगर, सारोळा बु, सार्वे बु प्र.लो, टाकळी बु, तारखेडा बु, वाणेगांव, वरसाडे प्र.पा.,विष्णूनगर, वाघुलखेडा, गोराडखेडा बु, वरखेडी बु व परधाडे येथे विहिरींचे खोलीकरण, आडवेबोर मारण्याची योजना हाती घेण्यात आली आहे.

१९ गावात विहिरी अधिग्रहित
विष्णूनगर, खेडगांव (नंदिचे), सातगांव डोंगरी, चिंचखेडा खुर्द, वेरुळी खुर्द, लासुरे, आर्वे, वडगांव खुप्र. भ., होळ, वडगांव बु प्र. पा., टाकळी बु, सारोळा खु, सांगवी प्र, भ., घुसर्डी बु, शिंदाड, लासगांव, वेरुळी बु, कुर्‍हाड बु, नाईकनगर, येथे खाजगी विहीरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.

१३ गावात तात्पूरत्या पाणी पुरवठा योजनांचे प्रस्ताव सादर
खडकदेवाळा खुर्द, बांबरुड प्र. बो., चिंचखेडा, कुर्‍हाड बु, नांद्रा, निंभोरी बु, पिंपळगाव (हरे.), सावखेडा खु सावखेडा बु सार्वे बु प्र. भ., भोजे, सातगांव डोंगरी सारोळा खु या गावांमधे टि पी डब्ल्यू एस अंतर्गत तात्तपुरत्या नळ पाणीपुरवठा योजनांचे प्रस्ताव सादर करुन निविदांची कारवाई सुरू झाली आहे.

चार गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू
तालुक्यातील शाहपूरा, खाजोळा, भोरटेक खु व वडगांव जोगे येथे टँकरने पाणी पुरवठा करणे सुरू झाले आहे. खडकदेवळा बु, सारोळा बु, वाघुलखेडा, वरखेडी बु व भोकरी येथे नविन विंधन विहिरी तर मोहाडी येथे दुहेरी पंप दुरुस्थीचा प्रस्थाव सादर करण्यात आला आहे.