पाचोरा नगपरिषदेस स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय समितीची भेट

0

पाचोरा । पाचोरा नगरपरिषदेत स्वच्छ महाराष्ट्र अभियानाअंतर्गत राज्यस्तरीय समितीने भेट दिली. त्यात पुण्याचे उपसंचालक विभागीय आयुक्त राजेंद्र चव्हाणे, प्रशासन अधिकारी नंदकिशोर बुराडे, पत्रकार सुनिल पाटील यांनी शहरात 27 व 28 एप्रिल रोजी पाहणी केली असता पुर्वी उघडयावर शौचालयांस बसण्याची ठिकाणे शासनाचे वैयक्तीक शौचालय योजनेअंतर्गत बांधलेली अनेक शौचालये, पैसे द्या वापर या तत्वावर बांधलेली शौचालय व सार्वजनीक शौचालयांची पाहणी केली. पालिका हद्दीतील सन 2011 च्या जनगणनेनूसार एकूण 1333 कुटूंबांकडे शौचालये नव्हती, सर्वेक्षाणानंतर 1500 कुटूंबाकडे शौचालय नव्हती. नगरपरिषदेने आज पावेतो खककङ योजनेअंतर्गत 1392 कुटूंब पात्र ठरवून अनुदानाचा पहिला हफ्ता वितरीत केलेला आहे. बांधकामाचे प्रत्येक टप्प्यानूसार अनुदानाचे वाटप करण्यात येत आहे. आज पावेतो 1006 शौचालयांचे बांधकाम पुर्ण होऊन त्यांचा वापर सुरु आहे.

सिटस पब्लिक टॉयलेट
वैयक्तीक शौचालयांची बांधकाम पुर्ण झालेल्या भागाची पाहणी केली असता विवेकानंद नगर, वंजारवाडी, भवानी नगर, मिलींद नगर, भारतीया नगर, रसुल नगर, आठवडे बाजार, कृष्णापुरी श्रीराम नगर, श्रीकृष्ण नगर, त्रंबकनगर, स्मशानभुमी पारिसर या ठिकाणांची पाहणी केली असता पाचोरा शहरात एकूण 30 ठिकाणी सार्व.शौचालय युनिट उपलब्ध असून त्यापैकी 16 युनिट खाजगी एजन्सीद्वारे पे एड युज तत्वावर चालविण्यात येत आहे.

46 जणांवर दंडात्मक कारवाई
गुडमॉर्नींग पथकाद्वारे दैनंदीन स्वरुपात जनजागृती करीत असतांना एकूण 46 नागरीकांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आल्याने शहरातील वंजारवाडी, पुनगांव रोड, भवानी नगर, गौंड वस्ती, संभाजी नगर, सम्राट अशोक नगर, स्मशानभुमी परिसर, आठवडे बाजार, अशी महत्वाच्या 7 ठिकाणी तपासणी केली असता कोणीही शौचालय बसल्याचे आढळुन आलेले नाही. या व्यतिरीक्त नव्याने 5 शौचालय युनिटचे बांधकाम नव्याने लवकरच करण्यात येत आहे.

यांची होती उपस्थिती
सदरवेळी मुख्याधिकारी किरण देशमुख, प्रशासन अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्य निरीक्षक, धनराज पाटील, मिळकत व्यवस्थापक साईदास जाधव, सहा.आरोग्य निरीक्षक उल्हास पाटील, पाणीपुरवठा अभियंता अमोल चौधरी, कर्मचारी अनिल मेघराज पाटील, राजेंद्र शिंपी, सुधिर पाटील, ललित सोनार, भिकन गायकवाड, दत्तात्रय पाटील, किशोर मराठे, वाल्मिक पाटील, सुनील चव्हाण, अरुण गायकवाड, देवीदास देहडे, बापु ब्राम्हणे, विनोद सोनवणे, निळकंठ ब्राम्हणे, प्रविण ब्राम्हणे, सुरेश पाटील आदी कर्मचारी उपस्थित होते.

  • 117 पुरूषांना तर स्त्रीयांसाठी 155 सिटस
  • घरकुल योजनेचा 400 कुटूंबांना लाभ