Suicide of youth in Pachora city पाचोरा : पाचोरा नगरपालिकेतील कंत्राटी पदावर कार्यरत असलेले अनिल बागुल (25, रा.जवाहर हौसिंग सोसायटी, पाचोरा) या तरुणाने रविवार, 14 ऑगस्ट रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेतला. आत्महत्या करण्याचे कारण कळू शकले नाही.
आत्महत्येचे कारण अस्पष्ट
तरुणाने गळफास घेतल्याचे लक्षात आल्यानंतर परीवाराच्या सदस्यांनी अनिल बागुल यास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.अमित साळुंखे यांनी मयत घोषित केले. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत अनिल बागुल यांच्या पश्चात वृद्ध आई, वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन भाऊ असा परीवार आहे.