काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील यांची टिका
पाचोरा – पाचोरा तालुक्याच्या राजकारणात नगरपरिषदेत राष्ट्रवादी-काँग्रेसने शिवसेनेला विकासाच्या नावाखाली बाहेरुन पाठिंबा दर्शविला आहे. बाजार समितीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमधे भागीदारी आहे. शेतकरी सहकारी संघात राष्ट्रवादी, भाजप व शिवसेनाची एकत्रित सत्ताअसुन पंचायत समितीत भाजपची सत्ता असुन राष्ट्रवादी काँग्रेस कधीही विरोधकाची भुमिका बजावत नाही. पालिकेतील शिवसेनेची सत्ता टिकवण्यासाठी 60 आणि 40 टक्के भागीदारीचा मुद्दा सर्वांनाच परिचित असुन आजी, माजी आमदार हे धोंड्या-कोंड्या सारसे पैसे कमविण्यासाठी रात्रभर एकत्रित येऊन लोकांची लोकांचे मनोरंजन करीत होते. दिवसभर पैशाचे वाटे पाडण्यासाठी भांडत होते, त्याच प्रमाने आजी माजी आमदार दिवसभर जकमैकावर दिवभर टिका करुन जनतेची दिशाभूल करतात मात्र रात्री वेगवेगळ्या ठिकाणी बैठका घेवून पैशाची वाटाघाटी करतात असा प्रखर शब्दात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत आजी माजी आमदार, भाजप शिवसेना, राष्ट्रवादीवर टीका केली.
Next Post