पाचोरा पिपल्स बँकेकडून गोर- गरिब कुटुंबांना किराणा वाटप

0

पाचोरा ( प्रतिनिधी ) : जगभरात गेल्या महिनाभरापासून कोरोना व्हायरस ने थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही त्याचे पडसाद उमटतांना दिसत आहे. यावर उपाय योजना म्हणुन गेल्या 23 मार्च पासून संपूर्ण देशात लाॅकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे रोजंदारी व हात मजुरी करणाऱ्या गोर – गरिबांवर उपासमारीची वेळ येवुन ठेपली आहे. या गोष्टीचा विचार करत दि. पाचोरा पिपल्स को – आॅफ बॅंक ही गोरगरिबांना मदतीचा हात देण्यासाठी पुढे आली आहे.

दि. ३ रोजी दुपारी २ वाजता शहरातील बाजोरिया नगर भागातील राध्येशाम अग्रवाल यांचे गोडावुन मध्ये घरगुती किराणा माल वाटपाची पाकिटे तयार करत त्यांनी सुरुवात केली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, पोलिस उपविभागीय अधिकारी ईश्र्वर कातकडे, , पोलिस निरीक्षक अनिल शिंदे, उपनिरीक्षक गणेश चौभे ,उपनगराध्यक्ष शरद पाटे, उद्योजक मुकुंद बिल्दीकर, पिपल्स बॅंकेचे संचालक जीवन जैन, प्रा. भागवत महालपुरे, प्रकाश पाटील, अॅड. अविनाश भालेराव, विकास वाघ, देवेंद्र कोटेचा, ऍड.स्वप्नील पाटील, विकास वाघ, पिपल्स बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एल. परदेशी, व्यवस्थापक पी. डी. पाटील, आर. एस. पाटील उपस्थित होते, रेहमान तडवी आदी उपस्थित होते. गरीब कुटुंबांना दिलेल्या जीवनावश्यक वस्तूंमध्ये ५ किलो गव्हाचे पिठ, ३ किलो तांदुळ, १ किलो तुर दाळ, १ किलो साखर, १ किलो तेल, १ मिठ पुडी, २०० ग्रॅम मिरची पावडर, २०० ग्रॅम हळद, २०० ग्रॅम चहा पावडर याप्रमाणे ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड नाही अशा सुमारे २ हजार ५०० गोर – गरिब कुटुंबियांना किराणा माल देण्यात येत आहे. बाजोरिया नगर येथील राध्येशाम अग्रवाल यांचे गोडावुनमध्ये सर्व किराणा मालाची पॅकींग करुन तेथुनच शहरात वाटप करण्यात येत आहे. याकामी सेवा भावी गृपचे मोहन अग्रवाल, सिताराम अग्रवाल, बबलु संघवी, माधवराव सिनकर, किशोर अग्रवाल, राजेश मोर, अंकित अग्रवाल, राजेश पटवारी, पप्पु मोर, योगेश अग्रवाल सह पिपल्स बॅंकेचे कर्मचारी सुरेश वारुळे, रहेमान तडवी, अतुल गेंदोडिया हे परिश्रम घेत आहेत.