पाचोरा-भडगांव तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी प्रांताधिकार्‍यांना साकडे

0

काँग्रेस आयचे आरोग्य सेवा सेलतर्फे विविध मागण्यांचे निवेदन
पाचोरा –पाचोरा-भडगांव तालुक्यातील शेतकर्‍यांच्या विविध प्रश्नांवर येथील उपविभागीय अधिकारी यांना कॉग्रेस आयकडून निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर उपविभागीय यांनी तातडीने कारवाई सुरू केली. पाचोरा – भडगांव तालुक्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्नावर कॉग्रेस आयचे आरोग्य सेवा सेल जिल्हाअध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांना तात्काळ शेतकर्यांच्या प्रश्नावर पाचोरा – भडगांव तहसीलदार यांना लेखी आदेश द्यावेत यासाठी निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.

निवेदनात या केल्या मागण्या
यावेळी पाचोरा-भडगांव तालुक्यातील शेतकर्‍यांना अद्यापही बोंड आळी चे हक्काचे अनुदान मिळालेले नाही ते अनुदान तात्काळ मिळावे, पाचोरा-भडगांव तालुक्यातील नैसर्गिक परीस्थिती बघता पावसाचे प्रमाण कमी झाले असल्याने तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी आणि 50 पैशांहुन कमी आणेवारी लावावीत, यासाठी दोन्ही तालुक्यांतील तहसीलदारांकडून लेखी प्रस्ताव घ्यावा, पाचोरा-भडगांव तालुक्यातील पिक कर्ज सरसकट माफ करण्या संदर्भात शासनाला कळवावे, ग्रामीण व शहरी भागातील विभक्त रेशनकार्ड पुन्हा सुरू करा, पिंपळगाव (हरेश्वर) ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नेमणुकीस देण्या संदर्भात जिल्हा आरोग्याधिकारी यांच्याशी पत्रव्यवहार करावा या मागण्या संदर्भात चर्चा करून उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी संबंधितांना तात्काळ पत्रव्यवहार केला त्यामुळे आंदोलकांनी समाधान व्यक्त केले.

यांची होती उपस्थिती
यावेळी आरोग्य सेवा सेल जिल्हाअध्यक्ष सचिन सोमवंशी, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष संदीप पाटिल, उपाध्यक्ष शकील शेख, अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष इरफान मनियार, पप्पू पाटील, साहेबराव पाटील, दिगंबर पाटील, प्रकाश पाटील, वसंत पाटील, इंदल चव्हाण, टिपु सुलतान, वसीम बागवान, हनीफ शेख, अनिल पवार, राहुल शिंदे, शंकर पवार, गणेश पाटील, हेमंत पाटील, शेख शरीफ खाटीक, शंकर ढमाले, सैय्यद युसूफ, पंढरीनाथ पाटील, सचिन पाटील, सोनू पाटील, राहुल शिंदे, संदीप पाटील, बंटी पाटील, मुकेश पाटील, सोनु पुजारी, पंकज राठोड, बंडु धमाले, विशाल हटकर, आदी उपस्थित होते.