पाचोरा महाविद्यालयात मतदार साक्षरता मंडळाची स्थापना

0

अध्यक्षपदी प्राचार्य डॉ.बी.एन.पाटील यांची निवड   
पाचोरा – पाचोरा मतदार संघात नवीन मतदारांची नाव नोंदणी व मतदारांमधे मतदानाविषयी जनजागृती होण्यासाठी मतदार साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात आली. उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे पाटील, तहसिलदार बी.ए. कापसे, प्राचार्य डॉ.बी. एन. पाटील यांचे उपस्थितीत ३० जनांची या मंडळावर वर्णी लावण्यात आली. समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ.बी.एन.पाटील, सदस्य विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.जे.डी.गोपाळ, प्रा.श्रावण तडवी, प्रा.आर.पी. महाले, प्रा.कमलाकर इंगळे, प्रा.आर.बी.वळवी, प्रा.आर.बी.पूरी, प्रा.संजू पाटील, प्रा.सुनिता मांडोळे, विद्यार्थी प्रतिनिधी चेतन महाजनसह 30 जणांची वर्णी लावण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे-पाटील यांनी मतदार नोंदणी व मतदानाचे महत्व पटवून देवून निकोप प्रशासन व चांगले प्रतिनिधी निवडून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमादरम्यान पाचोरा महाविद्यालयात लोकशाहीची भिंत, निवडणूकी संदर्भात पोस्टर, भिंतीपत्रके देखावे तयार करण्यात आले.

शनिवारी रांगोळी स्पर्धेचे आयोजन
पाचोरा येथील महाविद्यालयात मतदार जनजागृती विषयावर शनिवारी सकाळी ९:०० वाजता रांगोळी स्पर्धा तर सोमवारी सकाळी दहा वाजता निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.यात प्रथम तीन विजेत्यांना प्रशासनातर्फे पारितोषिक देण्यात येणार असून निवडणूक आयोग व जिल्हाधिकारी जळगाव यांचे आदेशानुसार १ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोंबर २०१८ पर्यंत १८ वर्षांवरील युवकांनी मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, मयत व्यक्तींचे व स्थलांतरित व्यक्तीचे नाव कमी करण्याची मोहीम सुरू असल्याने मतदारांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे यांनी केले आहे.