पाचोरा। शासनाने सरसकट कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतल्या ने अनेक धनदांडगे शेतकर्यांना देखील याचा लाभ होणार आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गरज नसलेल्यांना कर्जमाफी नाकारावी असे आवाहन केले आहे. आवाहनाला प्रतिसाद देत पाचोर्यातील शिंदे परिवाराने शासनाच्या कर्जमाफीचा लाभ न घेण्याचे ठरविले आहे.
सतीश परशराम शिंदे, रुपेश सतीश शिंदे, विजयाबाई सतिष शिंदे हे तीन शेतकरी कृष्णापुरी विकास सोसायटीचे कर्जदार सभासद असून त्यानी नियमितपणे कर्जफेड केलेली असली तरी शासन निकशाप्रमाणे कर्जमाफि मिळाल्यास ती आम्ही नाकारत असून गरीब व गरजू शेतकर्याला लाभ द्यावा, आमचे नाव कर्ज माफीच्या यादीत घेऊ नये असे पत्र सतीश शिंदे यांनी पाचोरा तहसीलदार यांना दिले आहे.