पाचोरा । येथील शहरातील संभाजी नगर भागातील नगरपालिका विभाग यांच्यामार्फत संभाजी नगर बुहरानी हायस्कुल समोर रस्त्याचे डांबरीकरण काम चालू असून हे काम गेल्या दोन महिना भरा पासून सुरु आहे या भागात रस्त्यावर जाड दगडी खडी टाकून रस्त्यावर पसरविले आहेत. यामुळे त्या प्रभागातील नागरिकांना रस्त्यावर पायी चालत असताना रस्त्या वर ठोकर खावे लागत आहे. सदर रस्त्यावरच्या साईटला जागोजागी मुरूम टाकून रस्ता खाली वर झालेला दिसत आहे. तसेच हनुमान मंदिर समोरील गटारीवर निरकृष्ठ दर्जाचे धाबे टाकून अर्धी गटारीवर मुरूम टाकून गटार बंद करण्यात आली आहे. बंद झालेल्या गटारीमुळे नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
काम करणार्या ठेकेदारांवर कारवाईची मागणी
बोगस कामाची तक्रार पाचोरा नगरपालिका मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करणार असल्याची माहिती परीसरातील नागरीकांकडून बोेलले जात आहे. या डांबरीकरण रस्त्याच्या कामात प्रभागातील नगरसेवक यांनी टक्केवारी मिळणार असून नगरसेवकांनी सुरु असलेल्या कामाकडे दुर्लक्ष केलेले दिसत आहे. तरी सदर रस्त्याच्या कामाची पाहणीही नगरपालिकेचे बांधकाम विभागातील अधिकारी श्री. भाटे यांनी पहाणी करूनही त्यांनी साधी दखल सुध्दा घेतली नसल्यामुळे नागरिकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्याचे झालेले अर्धवट काम चांगल्या पध्दतीने करावे, अशी नागरिकांनी मागणी केली आहे. तसेच सदर रस्त्याच्या बोगस कामाची चौकशी करुन संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करुन त्या रस्त्याचे पुन्हा चौकशी करुन ते काम अंदाजपत्रकानुसार होत आहे किंवा नाही याची पाहणी करावी. अशी मागणीही परीसरातील नागरीकांकडून होत आहे.