पाचोरा येथे आज विद्यार्थ्यांचा गुणगौरव

0

पाचोरा । पाचोरा येथील शेठ मुरलीधर मानसिंगका महाविद्यालयात शनिवार 9 जुलै रोजी सकाळी 9 वाजता गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण-गौरव व अंकुर नियतकालिकेचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या दुहेरी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. आमदार तथा पी.टी.सी. शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दिलीप वाघ उपस्थित राहणार असुन विद्यार्थ्यांचा गुण-गौरव व मार्गदर्शन ज्येष्ठ विचारवंत प्रा.श्रीधर सांळुखे (सातारा) तर आंकुर नियतकालिकेचे प्रकाशन पोलिस उपअधिक्षक केशव पातोंड यांच्याहस्ते केले जाणार आहे. पाचोरा येथील महाविद्यालयात होणार्‍या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हा.चेअरमन व्ही.टी.जोशी, मानद सचिव डॉ.एस.आर.देशमुख, कनिष्ठ महाविद्यालयाचे चेअरमन प्रा.एस.झेड.तोतला, गो.से.हायस्कुलचे चेअरमन खलिल देशमुख, स्पर्धा परिक्षेचे मार्गदर्शक प्रा.राजेंद्र चिंचोले, प्राचार्य डॉ.बी.एन. पाटील, उपप्राचार्य डॉ.एस.एम.पाटील, डॉ. वासुदेव वले, प्रा.एस.डी.थोरात, संचालक दुश्यंत रावळ, डॉ. जयंतराव पाटील, योगेश पाटील, सुरेश देवारे, प्रा.मंगला शिंदे, डॉ.पितांबर पाटील उपस्थित राहाणार आहे. कार्यक्रमास हजर राहण्याचे आवाहन केले आहे.