पाचोरा येथे उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबीर

0

पाचोरा। येथील रोटरी क्लब, भारत किडी केअर आणि अंकुर हास्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आईसह लहान मुलांचे मोफत आरोग्य शिबीराचे आयोजन रविवार 27 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नवकांर प्लाझा, भडगाव रोड, येथील कृषि उत्पन्न बाजार समितीचे समोर आयोजन करण्यात आले आहे.

शिबीरात लहान मुलांना व महिलांची तपासणी मोफत नामांकित डॉ. किशोर पाटील, डॉ. अर्चना पटवारी, डॉ. राहुल पटवारी यांच्या कडून करण्यात येणार आहे. काही ठराविक औषधी मोफत तर काही औषधी माफक दरात उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रकल्प प्रमुख म्हणून राजेंद्र भोसले, नंदु प्रजापत, रितेश ललवाणी आहेत. शिबिराचा जास्तीत जास्त गरजुंनी लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब अध्यक्ष अतुल शिरसमणे यांनी केले आहे