पाचोरा। देशाची आजची परीस्थिती दिवसेंदिवस कठीण होत चालली असुन या देशाचे संविधान बदलविण्याचे षडयंत्र सद्या सुरू आहे. बहुजन समाजाने वेळीच सावध नझाल्यास पुन्हा पारतंत्रात गेल्या शिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन औरंगाबाद येथील जेष्ठ विचारवंत अॅड.रमेश खंडागळे यांनी शहरातील नागसेन नगर येथे कार्यक्रमात बोलतांना केले. शहरातील नागसेन नगर भागात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती महोत्सवा निमित्ताने सम्राट अशोक सामाजिक व शैक्षणिक संस्था आयोजित कार्यक्रमात एक दिवशीय प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक खलिल देशमुख होते. तर प्रमुखस्थानी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष अॅड.अविनाश भालेराव, जिल्हा काँग्रेस आरोग्यसेल अध्यक्ष सचिन सोमवंशी, माजी नगरसेवक दत्ता बोरसे, राजेंद्र भोसले, मराठा सेवा संघ अध्यक्ष दिपक पाटील, प्रा.वैशाली बोरकर, नगरसेविका अस्मिता भालेराव, अनिल पाटील, सुनिल शिंदे, सभांजी ब्रिगेडचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, आरपीआयचे शशिकांत मोरे, आनंद नवगिरे आदी उपस्थितीत होते.
अॅड.खंडागळे पुढे बोलतांना म्हणाले की,भारता मध्ये कधी नव्हे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.जगाने सर्वोत्कृष्ट ठरविलेल्या भारताच्या सविंधान पुर्णलोकन च्या नावाखाली बदलविण्याचा घाट सुरू आहे.यासाठी सर्वांना एकत्र येवुन सघंटीत होवुन हा कट उधळुन लावला पाहीजे हे सर्वांनाचे कर्तव्य आहे. असे बोलुन शेवटी म्हणाले की, दलित समाज वेळीच सावधान झाला नाही तर हातात बाडंग आणि कमरेला फसाट्या आल्याशिवाय राहणार नाही. असे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सुत्रसचलंन प्रविण ब्राम्हणे यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मिलिंद तायडे, अविनाश पवार, राजु अहिरे, अविनाश खैरनार, अमोल गायकवाड, दिपक गायकवाड, दिपक तायडे यांनी परीश्रम घेतले.