पाचोरा येथे किरकोळ करणावरून दोन गटांत हाणामारी

0

पाचोरा । पाचोरा येथील संभाजी नगरात 24 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास दोन गटात तुडूंब हाणामारी झाली. जुन्या वादातून हाणामारी झाल्यामुळे पाचोरा पोलिसात परस्परविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रमजान ईदच्या आगोदर झालेल्या घटनेमुळे परीसरात प्रचंड तणावाचे वातावरण होते. पाहिल्या तक्रारीत पीडित तरूणीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 24 जून रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास जुन्या वादातून अशपाक पिंजारी (रा. संभाजी नगर) याने घराजवळ राहणार्‍या तरूणीला जून्या कारणावरून केस ओढून मारहाण करीत तिचा विनयभंग केला.

जुन्या वादातून झाली मारहाण
यावेळी पिडीत तरूणीच्या वडीलांनी तीचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता अशपाक अन्वर पिंजारी, वसीम पिंजारी, गफ्फार पिंजारी आणि सत्तार पिंजारी या सर्वांनी मिळून लोखंडी रॉडने मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी देत जातीवाचक शिवीगाळ केली. तरूणीचा विनयभंगासह अ‍ॅट्रासीटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी केशव पातोंड तपास करीत आहे. दुसर्‍या फिर्यादीत अशपाक पिंजारी यांनी म्हटले आहे की, जुन्या भांडणाच्या वादातून जगदीश ब्राम्हणे, विशाल सोनवणे, विकी सोनवणे, पप्पू सोनवणे आणि विशाल सोनवणे यांनी अशपाक यास लाकडी बांबूने मारहाण करून जखमी करून शिवीगाळ केली असल्याची तक्रार दिली असून दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि सचीन सानप करीत आहे.