पाचोरा येथे कोपर्डी घटनेबद्दल ‘एक गाव एक पणती’

0

पाचोरा । शहरातील शिवाजी महाराज चौकात पुतळ्याच्या आवारात कोपर्डी घटनेला एक वर्ष पूर्ण झाले असून ’एक गांव एक पणती’ हा कार्यक्रम मराठा क्रांतीच्या वतीने घेण्यात आला. शहरातील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ कोपर्डी घटनेतील भगिनी च्या मृत्यूस एक पुर्ण झाले तरी देखील शासनाने पाहिजे तसे गंभीरपणे घेतले नाही. त्यामुळे अजून ही सल मराठा समाजाला कायम आहे.

यांची होती उपस्थिती
एक पणती सहिष्णा सचिन सोमवंशी या विद्यार्थ्यांनीने लावली व सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी शहरातील सचिन सोमवंशी, जगदीश खिलोशिया, भुषण पाटील, निलेश शेलार, अनिल येवले, मुकेश पाटील, पप्पू पाटील, विशाल हटकर, सुप्रिया सोमवंशी, क्रांती पाटील, माया सुर्यवंशी, कुंदा पाटील, उज्ज्वला महाजन आदी उपस्थित होते.