पाचोरा येथे डॉ. आंबेडकर महोत्सवाची सांगता

0

पाचोरा। सम्राट अशोक सामाजिक व शैक्षणिक बहुद्देशिय संस्था आयोजित डॉ.बाबासाहेब आंबेडकर जंयती महोत्सवाची सांगता झाली. यात ’आम्ही देव्हांर बाजुला सारल,’ ‘जिजाऊ शिवाजी पाहीजे तर भिमाईचा भिम पाहीजे’हे जाणे गाजले. या कार्यक्रमात जयंती निमित्ताने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण घेण्यात आले. या कार्यक्रमात जेष्ठ समाजसेवक खलिल देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष अ‍ॅड.अविनाश भालेराव, जिल्हाआरोग्य सेलचे सचिन सोमवंशी, माजी नगरसेवक दत्ता पाटील, राजेंद्र भोसले, नगरसेविका अस्मिता भालेराव, वैशाली बोरकर, राष्ट्रवादीचे अझर खान, मराठा सेवा संघाचे दिपक पाटील, सुनिल शिंदे, सचिन सोनवणे, सभांजी ब्रिगेड अध्यक्ष राजेन्द्र पाटील, रिपाइंचे शशिकांत मोरे आदी उपस्थितीत होते.

महोत्सवात निबंध स्पर्धेत विजेत्यांना पुरस्कार
यावेळी खलिल देशमुख, सचिन सोमवंशी, अँड.अविनाश भालेराव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महोत्सवात निबंध स्पर्धेत प्रथम सरिता खैरनार,द्वितीय ज्योति नन्नवरे, तृतीय तेजश्री मोरे, चित्रकला स्पर्धेत प्रथम सुशिल खेडकर, द्वितीय दीक्षा बागुल, तृतीय गणेश मोरे, जनरल नॉलेज स्पर्धेत प्रथम आकाश नन्नवरे, द्वितीय जागृति तायडे, तृतीय दीपमाला शिरसाठ, सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम प्रगती खैरनार, द्वितीय पौर्णिमा सपकाळे, तृतीय राहुल लहासे यांनी बक्षीस मिळवले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समिती अध्यक्ष अविनाश पवार, उपाध्यक्ष अमोल गायकवाड, गोलु खैरनार, मिलिंद तायडे, दिपक सोनवणे, राजु अहिरे, दिपक तायडे आदींनी परीश्रम घेतले.