पाचोरा येथे पत्रकार संघातर्फे सतीश शिंदे यांचा सत्कार

0

पाचोरा । येथील कृष्णापुरी विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माजी नगरसेवक सतीशबापू शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे राजमाता जिजाऊ यांची प्रतिमा व शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी जळगाव धुळे नंदुरबार विभागीय अध्यक्ष व नाजरकैदचे विभागीय संपादक किशोर रायसाकडा, विभागीय उपाध्यक्ष गणेश शिंदे, जिल्हा उपध्यक्ष नितीन पाटील, जिल्हा ग्रामीण अध्यक्ष दिलीप जैन, जिल्हा कार्यअध्यक्ष योगेश पाटील, तालुकाध्यक्ष सी.एन. चौधरी, शहराध्यक्ष सचिन पाटील, संदीप महाजन, अनिल मराठे, भुणेश दूसाने, धनराज पाटील, अनिल येवले, निखिल मोर, छोटू सोनवणे, अनिल शर्मा, राकेश सोनवणे, महेंद्र अग्रवाल, सतीश ब्राम्हणे, शांताराम चौधरी आदी उपस्थित होते.