पाचोरा येथे पशुपालनावर सोमवारी कार्यशाळा

0

पाचोरा । महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) द्वारा जिल्हा उद्योग केंद्र जळगावमार्फत पंचायत समितीमध्ये सोमवारी 24 रोजी दुपारी 4 ते 6 वाजेदरम्यान शेळी व पशुपालनावर आधारित मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेत शेती व्यवसायांशी निगडीत असलेल्या शेळी, कुकुट व पशु पालन या व्यवसायांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी, अल्पभूधारक, बेरोजगार यांनी कार्यशाळाचे लाभ घेण्याचे आवाहन केले.