पाचोरा येथे पारसमुनींचे मासखमण पच्छखावणी

0

जळगाव । पाचोरा येथे जैन संत पारसमुनी यांचा चातुर्मास सुरु आहे. त्यांच्यासह आदित्यमुनी म.सा. व पंकजमुनी म.सा.आदि ठाणा 3 उपस्थित आहेत. पूज्य पारसमुनी यांचा यापूर्वी पाचोरा, अमळनेर येथे चातुर्मास झाला आहे. पाचोरा येथे सोमवारी पूज्य गुरुवर्य पारसमुनी म.सा.यांचे 29 उपवासाचे (तपश्‍चर्या) पच्छखावणी सोमवारी तर मासखमण पच्छखावणी मंगळवारी होणार आहे. त्यांच्यासोबत सारिका मेहता, पुष्पा धाडीवा, आकाश धुंधकिया, हर्षा संघवी, दिलीप शिसोदिया, कमलाबाई संघवी, प्रतिभा बाफणा, छाया रुणवाल, सुरेंद्र संघवी, ताराबाई बोथरा,सुनंदा धाडीवाल, पुनम रुणवाल, सोनाली बाफणा यांचीही तपसाधना सुरु आहे. तरी तपश्‍चर्या(पच्छखावणी) कार्यक्रमाला जैन भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जैन श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल श्रीश्रीमाळ यांनी केले आहे.