पाचोरा येथे बालदिनानिमित्त शैक्षणिक साहित्याचे वाटप

0

पाचोरा । स्व. पंडीत नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिनाचे औचित्य साधून मुलीला वडीलांनी दिलेल्या शैक्षणिक साहित्याचे गरजु विद्यार्थ्यांनीना मोफत वाटप करण्यात आले. येथील कोंडवाडा गल्ली परीसरात असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयात अनोखा उपक्रम राबविण्यात आला. बालदिनानिमित्त सकाळ पासून गिफ्ट मागणार्‍या कन्येला शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. येथील काँग्रेस आयचे आरोग्य सेल अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी त्यांच्या कन्या सहिष्णा सोमवंशी हिला बालदिनानिमित्त शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे येथील प्रसिद्ध स्त्रिरोगतज्ञ डॉ. शरद पठाडे, जिल्हा आरोग्य सेल अध्यक्ष सचिन सोमवंशी, पत्रकार दिलीप जैन, साहेबराव पाटील, पी.जी. चौधरी, कुंदा शिंदे, जयदीप पाटील, के.पी. पाटील, एस.डी. जाधव, आर.के. माळी, सहिष्णा सोमवंशी आदी ग्रामस्थ व विद्यार्थीनी उपस्थित होते.

या अनोख्या कार्यक्रमात डॉ. शरद पठाडे म्हणाले की, कोणतीही गोष्ट अशक्य नाही विद्यार्थ्यांनी स्वतः मध्ये जिज्ञासा ठेवली पाहिजे. प्रतिकुल परिस्थितीमध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी उच्चपदावर पोहचतात याची अनेक उदाहरणे आहेत. यावेळी सहिष्णा सोमवंशी हिने आपल्या मनोगतात म्हणाली की, माझ्या वडिलांना सकाळी गिफ्ट मागितले आणि त्यांनी जे गिफ्ट दिल्याचे सांगितले. सूत्रसंचालन अनिल पवार यांनी केले तर आभार सुवर्णसिंग राजपूत यांनी केले.