पाचोरा। भाजप कार्यालयात भारतीय जनता युवा मोर्चा पंचसुत्री कार्यक्रमासंदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी जळगाव ग्रामीणचे प्रभारी स्वप्नील लोकरे, युवा मोर्चा प्रदेश चिटणीस अंजली ठाकरे, जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद शेलार यांनी कॉलेज कनेक्टिन्ग, खेलो इंडिया खेलो, युवा महाराष्ट्र युवा सरकार, घे भरारी, दहा हजार शाखा ओपनीग या संदर्भात उपस्थीतीत युवा मोर्चा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
तालुक्यातून कार्यकर्त्यांची उपस्थिती
भाजपा शहराध्यक्ष नंदू सोमवशी, तालुका सरचिटणीस प्रदीप पाटील, पं.स.सदस्य बंसी पाटील, भाजयुमो जिल्हा चिटणीस किशोर पाटील, तालुकाध्यक्ष कमलेश पाटील, सरचिटणीस किशोर निभोरीकर, शुभम पाटील, शहर ाध्यक्ष बबन जाधव, सरचिटणीस दिपक माने, नवनिर्वाचित युवती, शहराध्यक्ष प्रियंका मोराणकर, तालुकाध्यक्ष श्रध्दा पाटील, कॉलेज कनेंटीग सयोजक पंढरीनाथ पाटील यांच्यासह सर्व युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थीत होते.