पाचोरा । मराठा सेवा संघ पाचोरा तर्फे भव्य सत्कार समारंभ व आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी गाळण येथील आश्रम शाळेतील शिक्षक सत्यवान महाजन यांचे सुपुत्र मनोज महाजन यांची यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांच्या आई वडिलांचा सत्कार करण्यात आला. याच बरोबर एमएसईबी चे पदाधिकारी एस.के.अण्णा पाटील व नगरपालिकाचे कर्मचारी उल्हास पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सत्कार करण्यात आला. तसेच अॅड.अभय पाटील, एस.के पाटील, गाळणचे राजेन्द्र पाटील, पत्रकार सुरेश तांबे, संजय मधुकर पाटील यांचा वाढदिवस निमित्ताने सर्व मान्यवारांच्या वतीने मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
डॉ.प्रशांत पाटील, मंगेश पाटील, सचिन सोमवंशी, नगरसेवक अमोल शिंदे, विकास पाटील व मनीष भोसले, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्यध्यक्ष रवींद्र पाटील, अनिल पाटील, जीभाऊ पाटील, अनिल मराठे, सुरेश शिंदे, मुकेश तुपे, रणजीत पाटील, मयूर पाटील, मनोज पाटील, किरण पाटील, एस.ए. पाटील, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, प्रा. प्रदीप वाघ, अरविंद पाटील, विनोद पाटील, सुनील पाटील, मनोज सोनार, केव्हीन पाटील, श्री अहिरे समाजातील सर्व स्तरातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंगेश पाटील यांनी केले सूत्रसंचालन वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे विभागीय अध्यक्ष तेजस पाटील यांनी तर आभार सुरेश शिंदे यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिका़र्यांनी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.