पाचोरा । महाराष्ट्र प्रदेश युवक कॉग्रेस आयोजीत जळगाव लोकसभा युवक कॉग्रेसच्या वतीने युवा किसान संघर्ष यात्रचे आयोजन करण्यात आले होते. याचाच पहिला टप्पा आज संपन्न झाला यावेळी युवक कॉग्रेसच्या पदाधिकार्यांनी चाळीसगाव बस स्थानकापासुन संघर्ष यात्रेस सुरुवात केली. चाळीसगाव येथुन भडगाव व भडगाव येथुन पाचोरा याठिकाणी सर्व पदाधिकार्यांनी एसटीबसने प्रवास करुन बसस्थानकावर उपस्थित आणि एसटीमधे बसुन सर्व शेतकरी बंधुंशी संवाद साधत संपूर्ण राज्यभरात सुरु असलेल्या शेतकरी संपास पाठींबा दिला.
यावेळी युवक कॉग्रेसचे प्रदेश सचीव स्वप्निल पाटील, युवक कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष पराग पाटील, जिल्हा सरचिटणीस अविनाश भालेराव, इंटकचे सचीव रवींद्र नाना, शहराध्यक्ष मुक्तार शहा, अमळनेर अध्यक्ष अमोल माळी, हर्षल जाधव आदि उपस्थित होते. शेतकरी संपास पाठींबा देत युवक कॉग्रेसचे प्रदेश सचीव स्वप्निल पाटील व जिल्हाध्यक्ष पराग पाटील यांनी शेतकर्यांना संपुर्ण कर्जमाफी झाली पाहीजे, आत्महत्या ग्रस्त शेतकर्यांच्या मुलांना नोकरी मिळावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींना माण्यता द्यावी,शेतीमालास योग्य हमीभाव द्यावा,कृषी पंपांची विजबील माफी करावी आदि प्रमुख मागण्यांवर प्रकाशझोत टाकत हया मागण्या मान्य करण्याची मागणी केली.
प्रास्ताविक अमळनेर अध्यक्ष अमोल माळी यांनी केले. या अनोख्या आंदोलणाला शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देत भाजप सरकारच्या विरुद्ध तिव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी मनोज बोरसे, राहुल पाटील, हेमंत वाघ, भुषण पाटील, पराग कोल्हे, मनोज बिर्हाडे, निलेश वानखेडे, हेमंत वाघ, समाधान पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.