पाचोरा। येथील श्री.गो.से.हायस्कुलमध्ये अक्षरंग 2017 अंतर्गत रंगभरण व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले. स्पर्धेत इयत्ता 3 री व 4 थीच्या सुमारे 70 विद्यार्थी विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला. सात विद्यार्थ्यांना चालना मिळावी या उद्देशाने शिल्ड, प्रशस्तीपत्र, व रोख स्वरुपाचे बक्षीस देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक एस.डी.पाटील, उपमुख्याध्यापक एल.एस.शिंपी, ए.जे.महाजन, वाघ, एस.एम.पाटील, ए.बी. अहिरे, सुबोध कांतायन, प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.
विजेते सात विद्यार्थ्यांना दिले पारितोषिक
यात रंगभरण स्पर्धेत प्रथम सुमित रामराव पाटील, ज्यात (551 रुपये रोख, प्रशस्तीपत्र) व द्वितीय अश्विनी नाईक (351 रुपये रोख व प्रशस्तीपत्र ) तृतीय मधुरा दिनेश मोरे (251 रुपये रोख व प्रशस्तीपत्र), उत्तेजनार्थ पारितोषिक कार्तिक नंदकुमार शेलकर (151 रुपये रोख व प्रशस्तीत्र), तर सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम वैष्णवी वाल्मिक पाटील (551 रुपये रोख, प्रशस्तीपत्र व शिल्ड), द्वितीय मधुरा दिनेश मोरे (351 रुपये रोख प्रशस्तीपत्र व शिल्ड), तृतीय राजेश्वरी योगेशंद्र लोहार (251 रुपये रोख, प्रशस्तीपत्र व शिल्ड) तर उत्तेजनार्थ निखिल शिवराम बारेला याने 151 रुपयांचे पारितोषीक पटकाविले आहे. स्पर्धेच्या बक्षीस वितरणाप्रसंगी शलेय समिती चेअरमन खलील देशमुख यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करुन मार्गदर्शन केले.