जळगाव । शिवजयंती महाराष्ट्रीय व्यक्ती सण-उत्सवाप्रमाणे साजरी करीत असतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक परमप्रतापी छत्रपती शिवाजी महाराजांचे हे 387 वे जयंती वर्ष आहे. संपूर्ण राज्यभर रविवारी शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून शिवभक्तांकडून शिवजयंतीची तयारी सुरु होती. जयंती निमित्त जिल्ह्यातील विविध संघटना, सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालय, राजकीय पक्षातर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. तसेच जयंती निमित्त शिवाजी महाराजांच्या वेषभुषा परिधान करुन अश्व व प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. भजन, कीर्तन, पोवाड्यांच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले.
चोपडा येथे मराठा समाज पतसंस्थेतर्फे शिवजयंती उत्साहात
चोपडा। येथील मराठा समाज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चोपडा यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. संस्थेचे चेअरमन किरणकुमार देशमुख, जेष्ठ संचालक जगन्नाथ पाटील, मिनाताई देशमुख यांनी प्रतिमा पुजन केली. याप्रसंगी सभासद बाळासाहेब देशमुख, व्हा. चेअरमन सोपान जाधव, संचालक दिलीप पाटील, अमृतराव वाघ, भगवान पाटील, जगन्नाथ पाटील यांच्यासह सभासद व ठेवीदार उपस्थित होते. उपस्थितांनी शिवाजी महाराजांचा जीवनपट सांगितले. सुत्रसंचालन व्यवस्थापक मनोज विसावे यांनी तर आभार महेंद्र पाटील यांनी केले.
अमळनेर येथे पुतळा पुजन व मिरवणूक
अमळनेर। येथे शिवाजी महाराजा महाराष्ट्रांतील सर्वात उंचीचा 18 फुटी अश्वरुढ पुतळ्याचे पुजन करण्यात आले. आमदार शिरीष चौधरी व डॉ.रविंद्र चौधरी यांच्या प्रयत्नाने शिवाजी महाराज नाट्य गृहात नविनच पुतळा बसविण्यात आला आहे. शिवजयंती निमित्त याचे पुजन करण्यात आले. आमदार शिरीष चौधरी मित्र परीवाराने पुतळा पुजनासाठी रितसर परवानगी मागितली होती. परतुं परवानगी नाकारण्यात आली. तरीही शिरीषदादा चौधरी मित्र परीवाराने पुतळ्याची स्वच्छता करुण सकाळी 10:30 वा अतिशय जल्लोशात भव्यपुष्पहार अर्पण करून पुजन केले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. दरम्यान शिवजयंती निमित्त शहरातुन भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. शिवाजी महाराजांची भुमिका विवेक पाटील या तरुणांने साकारली होती. याप्रसंगी न.पा गटनेते प्रविण पाठक , श्रीराम चौधरी, सुनिल भामरे , उदय पाटील ,महेश देशमुख , भाऊसाहेब महाजन , सलीम टोपी , अशोक पवार , अबु महाजन ,किरण सावंत ,पंकज चौधरी, किरण बागुल ,सतोष लोहेरे ,पंकज साळी ,पराग चौधरी , अॅड. गोपाल पाटील, रणजित शिदे ,सोपान लोहार ,सुरेश पाटील ,गोपी कासार , विजेद्रं शिरसाळे ,शशांक सदांशिव ,स्वामी चौधरी ,नितीन लोहेरे ,गुलाब नबी ,नरेश काबंळे ,लक्ष्मण महाजन,दिपक चौगुले ,किरण गोसावी आमदार शिरीषदादा मित्र परीवाराचे कार्यकर्ते व शिवप्रेमी उपस्थित होते.
शिंदाड येथे शिवजयंती साजरी
पाचोरा तालुक्यातील शिंदाड या गावात शिवजयंती साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मंगलबाई पाटील यांच्या हस्ते शवछत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा पुजन करण्यात आली. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अॅड.अभय पाटील, आनंदा तेली, आशाबाई तांबे, सदाशिव पाटील, मिलींद साबळे, आरमाण बेग रज्जाक, शशिकांत पाटील, मुनिर तडवी, गीतु पाटील, पत्रकार किशन पाटील, लीलाबाई पाटील यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
चोपडा महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात शिवजयंती
चोपडा। येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची 387 वी जयंती उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख वक्ते म्हणुन संजय बारी उपस्थित होते. सुरुवातीस विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील चौधरी, वक्ते संजय बारी, जेष्ठ शिक्षक सागर विसपुते, विजय शेलार, प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका प्रभावती पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी बोलतांना बारी यांनी आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची राज्यव्यवस्था, त्यांच्या राजवटीतील कायदे व्यवस्था सुसंगत असल्याचे सांगत राजांची कर्तव्य व न्यायनिष्ठा या विषयी गोष्टी रुपात माहिती सांगितली. आजही जगभरातील विविध देशात शिवाजी महाराजांनी जलसिंचन, शेती, जंगल व्यवस्थापन, स्त्री सन्मान याविषयी केलेले कार्य प्रेरणादायी ठरत असल्याची उदाहरणे दिली. सूत्रसंचालन भावेश लोहार यांनी केले. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
चाळीसगावात मुस्लिम बांधवांनी साजरी केली शिवजयंती
चाळीसगाव। शहर हे हिंदु- मुस्लिम एैक्याचे माहेर घर असल्याचे प्रसिध्द आहे. पीर मुसा कादरी उर्फ बामोशी बाबा यांच्या (उर्स) यात्रेत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन होते. याठिकाणी हिंदू मुस्लिम बांधव एकोप्याने हा उत्सव साजरा करतात. दरम्यान शिवजयंती निमित्त हिंदु-मुस्लिम एकतेचे दर्शन शहरातील नागरिकांना झाला. शहरात शिवजयंती निमित्त हिंदु मुस्लिम एकतेचे दर्शन घडून आले. रविवारी 19 रोजी शहरातील मुस्लिम बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली. महाराजांच्या पुतळ्याचे पूजन नगरसेवक चिरागोद्दीन शेख, फकिरा मिर्झा बेग, रियाज शेख, माजी उपसरपंच व रयत सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष मुराद पटेल, सह्याद्री प्रतिष्ठानचे आरिफ खाटीक, शेख रियाज शकूर, अस्लम मिर्झा, कैसर खाटीक, रफिक शेख, विजय गायकवाड, खलील खान, आदी हिंदू मुस्लिम समाज बांधवानी केले. यामुळे पद्धतीच्या सामाजिक सलोखा व धार्मिक सामंजस्य वाठीस लागण्यास मदत होणार आहे.
चाळीसगाव येथे रयत सेनेच्यावतीने शिवजयंती साजरी
चाळीसगाव। छत्रपती शिवाजी महाराजांची 387 वी जयंती चाळीसगाव शहरातील रयत सेनेच्या वतीने साजरी करण्यात आली. रविवारी 19 रोजी भडगाव रोडवरील कॅप्टन कॉर्नर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुजन आमदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्या व्यक्तिंचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन रयतसेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी केली होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन आमदार पाटील व गणेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. समाजाचे देणे लागतो या भुमिकेतुन रयत सेनेने समाजातील वंचित घटकासाठी विमा पॉलीसी कवच देणे, शेतकर्यांच्या मालात मापात पाप करणार्या बाजार समिती प्रशासना विरोधात आंदोलन करून शेतकर्यांना न्याय देणे, भडगाव येथील निशा दिलिप पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सर्वच क्षेत्रात खारीचा वाटा उचलत सामाजिक कार्यात अग्रेसर राहणार असल्याचे आश्वासन त्यांनी उपस्थिताना दिले. आमदार पाटील यांनी कार्यक्रमाचे आयोजन करणार्यांचे कौतुक करत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा निर्मितीची प्रक्रिया अंतीम टप्प्यात असुन लवकरच चाळीसगाव येथे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पाच हजार स्क्वेअर फुटाचा पुर्णाकृती पुतळा पूर्ण होणार असल्याचे सांगीतले. याबाबत मुख्यमंत्री, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करुन ही प्रक्रिया सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रपती शौर्यपुरस्कार प्राप्त निशा पाटील (भडगाव), छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त नितीन पाटील (वडगाव ता.कन्नड), संशोधक संशोधक शेतकरी पुरस्कार प्राप्त नाना पाटील, लेखिका म्हणुन बहुमान मिळालेल्या ललीता पाटील (पाचोरा), कलाश्री पुरस्कार प्राप्त कवी व चित्रकार दिनेश चव्हाण (चाळीसगाव), आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत रौप्यपदक विजेते कल्पेश महाले यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी नगराध्यक्षा आशालता चव्हाण, नगरसेविका रंजना सोनवणे, नगरसेवक सुरेश स्वार, जिल्हा बॅकेचे सचालक वाडीलाल राठोड. बेलगंगे चेअरमन चित्रसेन पाटील, शिक्षणाधिकारी शिवाजीराव पाटील, राष्ट्रीय विद्यालयाचे संचालक सुधिर पाटील, अविनाश देशमुख, सहाय्यक पो .नि. सुरेश शिरसाठ, आण्णा कोळी, घुष्णेश्वर पाटील, रामचंद्र जाधव, दिपक पाटील, रवींद्र चौधरी, चद्रकांत तायडे, अरुण अहिर, चिराग शेख, जगदीश चौधरी, प्रकाश पवार, संगिता गवळी, विजया पवार, अलका गवळी, झेलाबाई पाटील, आर.एल. पाटील, सुरेश चौधरी, संजय घोडेस्वार, डॉ विनोद कोतकर, डॉ.प्रमोद सोनवणे, उमेश राजपुत, किशोर पाटील, विश्वजित पाटील, धंनजय मांडोळे, आनंदा साळुंखे, प्रा.तुसार निकम, राजेश पवार, नानाभाऊ पवार, भैय्यासाहेब पाटील, भाऊसाहेब पाटील, भिकन पवार, राजेंद्र गवळी, ज्ञानेश्वर पाटील, मनोहर सूर्यवंशी, रमेश सोनवणे, शिवाजी बहाळकर, वसंत चव्हाण, अमोल घोडेस्वार, जितेंद्र पाटील, भाऊसाहेब पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रपती शौर्यपुरस्कार प्राप्त निशा पाटील (भडगाव), छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार प्राप्त नितीन पाटील (वडगाव ता.कन्नड), संशोधक संशोधक शेतकरी पुरस्कार प्राप्त नाना पाटील, लेखिका म्हणुन बहुमान मिळालेल्या ललीता पाटील (पाचोरा), कलाश्री पुरस्कार प्राप्त कवी व चित्रकार दिनेश चव्हाण (चाळीसगाव), आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत रौप्यपदक विजेते कल्पेश महाले यांचा गौरव करण्यात आला.
सह्याद्री प्रतिष्ठानतर्फे देवळी येथे शिवजयंती
चाळीसगाव। शहरातील सह्याद्री प्रतिष्ठान व वाडी येथील बजरंग मित्र मंडळातर्फे रविवारी 19 रोजी शहरात व तालुक्यातील देवळी येथे साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्त मोटार सायकल रॅली काढण्यात आली. तालुक्यातील एकमेव अश्वरुढ पुतळ्याचे पुजन करण्यात आले. दिलीप घोरपडे, जिल्हा संपर्क प्रमुख शुभम चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, विवेक रणदिवे, प्रकाश नायर, पप्पू राजपूत, अजय जोशी, रवींद्र सूर्यवंशी, शरद पाटील, मुन्ना पगार, गौरव पाटील, निलेश हमलाई, पुंजाराम पाटील, जितेंद्र सूर्यवंशी, रोशन रणदिवे, सागर सूर्यवंशी, शुभम सूर्यवंशी, विनोद पाटील, आबासाहेब पाटील, नितीन पाटील, लखन पाटील, गणेश पाटील, सुनील रणदिवे, अमोल पाटील, भूषण मिस्तरी, गोरख काकळीज, जुगराज पाटील, पवन पाटील, भाऊसाहेब पाटील यांच्यासह देवळी गावातील समाज बांधव उपस्थित होते.
जामनेरमध्ये शिवाजी महाराजांना अभिवादन
जामनेर। शहरासह परीसरात शिव छत्रपतींना जयंतीनिमीत्त वंदन करण्यात आले. न.प.चौकात छत्रपतींच्या मुर्तीस नगराध्यक्षा साधना महाजन, नगरसेवीका संध्या पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवान केले. तर नवीन पंचायत समीती कार्यालया समोरील आवारात माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी, नाना पाटील, प्रल्हाद बोरसे, संभाजी पाटील, सुनील पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. यावेळी विविध सामाजिक संघटना, एकलव्य, ज्ञानगंगा विद्यालयाच्या विद्यार्थ्यानी वतीने सजीव देखावा सादर करण्यात आला. तसेच प्रतिमा मिरवणुक काढण्यात आली.
पाचोरा। येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शहरातुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. सकाळी 9 वाजता संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत शिवाजी महाराज व मॉ.साहेब जिजाऊ याच्या देखाव्याची भुमिका साकारण्यात आली होती. मिरवणुक मार्गात विविध प्रकारे रांगोळी काढण्यात आली. चौकाचौकात भगवे झेंडे फडकताना दिसून येत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे पवाडे व इतिहास विषयक गीत वाजविण्यात येत होते. रॅलीच्या सुरुवातीस शासकीय पध्दतीने छत्रपती शिवाजी चौकात भगवा ध्वज पोलीस उपअधीक्षक केशव पातोड, पोलीस निरीक्षक नवलनाथ तांबे, अविनाश आधळे, तहसीलदार मदार कुलकर्णी, मुख्याधिकारी किरण देशमुख, भूषण वाघ, अमोल शिंदे याच्या हस्ते फडकविण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला भूषण वाघ, अमोल शिंदे व सर्व शासकीय अधिकारी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. शिवाजी चौक, स्टेशन रोड, देशमुखवाडी, आठवडे बाजार, गांधी चौक, जामनेर रोड मार्गे भव्य रॅली काढण्यात आली. रॅलीत घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका गुणवंत साळूखे व जिजाऊ यांची भूमिका प्रियंका गोलारे, गौरी पाटील यांनी केल्या. या रॅली मध्ये विविध मंडळाच्या पदाधिकारीने आरास देखाव्यासाठी सहभाग नोंदविलेले दिसत आहे तसेच गुरुकुल इंग्लिश मेडियम, गो.से.हायस्कुल, विठाबाई कन्या व उच्च माध्यमिक विद्यालय, पी.के. शिंदे माध्यमिक प्राथमिक विद्यालय, जागृती विद्यालयाच्या विद्यार्थीनी लेझीम पथकात सहभाग घेतला. या कार्यक्रमासाठी उपनगराध्यक्ष शरद पाटे, नगरसेवक विकास पाटील, नगरसेवक वासुदेव महाजन, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील, जिल्हाकार्याध्यक्ष रवींद्र पाटील, अनिल मराठे, अनिलदादा देशमुख यांनी परिश्रम घेतले. या वेळी मराठा सेवा संघाचे एन.आर.ठाकरे, एस.के. पाटील, आर. एन. पाटील, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय उपाध्यक्ष गणेश शिंदे, विशाल थोरात, गोकुळ पाटील, विनोद देवरे, संजय पाटील, गौरव वाघ, मच्छिद्र पाटील, जीभाऊ पाटील, केविन पाटील, गणेश पाटील, योगेश पाटील, प्रवीण पाटील, जीभाऊ शिंदे, संजय पाटील, रवी देवरे, प्रदीप वाघ, राजू भोसले, बंटी जगताप, दीपक जाधव, पंढरीनाथ सावळे, सुरेश धडवी, विशाल पाटील, रणजित पाटील, अमोल पाटील यांच्यासह राजकीय, सामाजिक, शासकीय अधिकारी, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चाळीसगाव तालुक्यातील खडकी बु. येथे उर्दू शाळेत रविवारी 19 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी उपसरपंच मुराद पटेल, व उर्दू शाळेतील बाळ गोपाळ यांनी प्रतिमा पुजन केले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.