पाचोरा । पाचोरा तालुका शिवसेनेने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. अशा प्रकारच्या रोजगार मेळाव्याचे आयोजन पाचोरा तालुका शिवसेना प्रथमच करीत आहे. निर्मल इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर हा मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यास राज्याचे उद्योगमंत्री ना.सुभाष देसाई उपस्थित राहणार आहेत. तसेच सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. पाचोरा-भडगावचे माजी आमदार आर.ओ.पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ नेते सुरेशदादा जैन यांचीही उपस्थित राहणार आहेत. तसेच जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर व नगराध्यक्ष संजय गोहिल उपस्थित राहणार आहेत. रोजगार मेळावा तालुक्यात प्रथमच होत असल्यामुळे मेळाव्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. पाचोरा – भडगाव तालुक्यातील बेरोजगारांसाठी हा मेळावा वरदान ठरणारा आहे.
योग्यतेनुसार मुलाखतीस बोलविणार
या मेळाव्यात नोंदणी करणार्या बेरोजगारांची अगोदर नोंदणी केलेली असून त्याच्या शैक्षणिक योग्यतेनुसार कंपनीकडे त्या बेरोजगार युवकाला मुलाखतीसाठी पाठविले जाणार आहे. शैक्षणिक व मेरीटनुसार निवड होणार आहे. यासाठी शिवसैनिकांची स्वयंसेवक म्हणून निवड केली आहे. तसेच या रोजगार मेळाव्यात आर्थिकदृष्ट्या कमकुवत व गरीब महिला व बचतगटांना लघु÷उद्योगासाठी बँकांच्या प्रतिनिधींनादेखील बोलावले आहे. जेणेकरुन महिला सक्षम बनू शकतील. या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी किशोर बागणकर, पप्पू राजपूत, गणेश पाटील, दत्ता जडे, भरत खंडेलवाल तसेच जि.प.सदस्य रावसाहेब पाटील, पद्मसिंग पाटील, दीपकसिंग राजपूत यांच्यासह शिवसैनिक व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. मेळाव्याची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत राहिल. मेळाव्याच्या ठिकाणी अल्पोहार व भोजनाची व्यवस्था आहे.