पाचोरा येथे शिवसेनेतर्फे मोतीबिंदू शिबीर

0

पाचोरा । शिवसेना वर्धापनदिनानिमित्त आमदार किशोर पाटील यांच्याहस्ते शिवतिर्थ शिवसेना कार्यालयात येथे मोतीबिंदु मुक्त पाचोरा-भडगाव अभियानाला रूग्णांच्या उत्स्फुर्त प्रतिसादासह सुरूवात करण्यात आली. यावेळी पाचोरा शहर व तालुका परीसरातील 500 रूग्णांनी शिबीरात सहभाग नोंदवला. आणि डोळे तपासणी रूग्णांमधुन 25 मोतीबिंदु ग्रस्त रूग्णांना अ‍ॅम्बुलन्सने पुढील उपचारासाठी व मोफत मोतीबिंदु शस्त्रक्रियासाठी जळगाव कांताई हॉस्पिटलला रवाना करण्यात आले. यावेळी सोबत माजी आमदार आर. ओ. पाटील होते. शिबीरामध्ये सर्व रूग्णांचे डोळे तपासण्यात आले असून डोळेंचे विविध त्रासांनी ग्रस्त असलेले रूग्णांची तपासणी करूण योग्य सल्ला व मार्गदर्शन आणि औषध उपचार डॉक्टरांच्या टिमच्या मदतीने करण्यात आले.

रूग्णांचे येण्याजाण्याचा, जेवनाचा व राहण्याचा तसेच शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहे. शिबीरात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.समाधान वाघ, नगराध्यक्ष संजय गोहिल, शरद पाटे, गणेश सर, पप्पुदादा राजपुत, किशोर बारवरकर, भरत खंडेलवाल, दिपक राजपुत, नगरसेवक सतिष चेडे, गंगारामभाऊ तेली, दादाभाऊ चौधरी, बापु हटकर, विशाल डॉन, जि.प सदस्य रावसाहेब पाटील, पदमबापु पाटील उपस्थित होते. या शिबीराला यशस्वीतेसाठी डॉ.संतोष पवार, डॉ.प्रमोद जैन, डॉ.प्रमोद महाजन, भागवत पवार, तालुका आरोग्य केंद्र, पाचोरा वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी टिम आणि सर्व आशासेविका यांचे योगदान व अनमोल सहकार्य लाभले.