पाचोरा। मंगळवार 6 जुन रोजी छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पाचोरा येथे उत्साहात पार पडला. शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला शिवश्री विलास पाटील, रविंद्र चव्हाण यांनी पुष्पहार घालून पूजन केले नंतर महाराजांच्या सिंहासनाधिश्वर पुतळयाचे दीपाली पाटील, पुनम पाटील, गौरी पाटील, शिवा पाटील, चेतन पाटील, बळीराज पाटील, पुनीत पाटील या चिमुकल्यानी पूजन केले जय जिजाऊ जय शिवराय चा घोषणा देण्यात आल्या. या वेळी जिजाऊ वंदना गजमल पाटील यांनी गाण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघ शहराध्यक्ष एस.ए. पाटील यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला उपस्थिती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाकार्याध्यक्ष रविंद्र पाटील, राजे संभाजी युवा फाऊंडेशन संस्थापक भूषण देशमुख, अविनाश भालेराव, मंगेश पाटील, विकास पाटील सर, मराठा सेवा संघ सचिव सुनील पाटील, कराटे असोशियन चे प्रकाश निकुम्भ, आनंदसिंग राजपूत, निलेश पाटील, राजेंद्र पाटील (गाळण) यांनी दिली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संभाजी ब्रिगेडचे राजेंद्र पाटील, गणेश पाटील, अनिल मराठे, गजमल पाटील, मनोज सोनार, राजे संभाजी युवा फाउंडेशन तालुकाध्यक्ष प्रवीण पाटील, रणजीत पाटील, सोनू पाटील, भावराव जगताप, यांनी परिश्रम घेतले.