जळगाव। पंचायत समितीवर सत्तास्थापनेसाठी काही दिवसाची अवधी बाकी आहे. सर्वच राजकीय पक्षातर्फे गटनेते पदाची निवड प्रक्रिया सुरु केली आहे.
जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी गट नोंदणी पुर्ण केली आहे. राष्ट्रवादी पाचोरा पंचायत समिती गटनेतेपदी ललित वाघ यांची निवड करण्यात आली आहे. गटनेतेपदी निवडीनंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नोंदणी केली.