पाचोरा शहरातील अतिक्रमणांवर हातोडा

0

जळगाव। तिन दिवसांपूर्वी पाचोरा येथील जारगांव चौफुली परिसरात अतिक्रमणाच्या विळख्यात अरुंद झालेल्या हायवे रस्त्याच्या कडेला उभे असणार्‍या दोन निष्पाप तरुणांना भरधाव ट्रकने चिरडून ठार केले होते. या चौफुलीवर या आगोदरही अनेक जीवघेणे अपघात घडले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत या हायवे रस्त्यावरच्या जागेत महाराणा प्रताप चौक ते जळगांव चौफुलीपर्यंत प्रचंड प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने अपघातांना हेच एकमेव कारण ठरत आहे. अपघातात अत्यंत विदारक व भयावह अवस्थेत ठार झालेल्या तरुणांच्या मृत्युने शहर हादरले. तर तालुक्याचे लोकप्रिय आमदार किशोर पाटील यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत शासकिय विश्राम गृहात सर्व अधिकार्‍यांसह पत्रकारांची तातडीची बैठक बोलवली होती. हायवेवर जीवघेण्या अपघातांना कारणीभूत ठरणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाला धारेवर धरुन तातडीने सार्वजनिक विभागांतर्गत महाराणा प्रताप चौकापासून ते जारगांव चौफुली व जळगांव चौफुलीपर्यंत वाढलेले सर्व अतिक्रमण दोन दिवसात काढण्याचे फर्मान सुनावले. तसेच पाचोरा न.पा. मुख्यधिकारी यांनाही शहराच्या रहदारिला व व्यावसायीकांसह नागरीकांना त्रासदायक ठरणारे अतिक्रमण लवकर काढण्याचे आदेश दिले.

अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अतिक्रमणधारकांची धावपळ
कामी पोलीस प्रशासनाने बंदोबस्त पुरवून सहकार्य करण्याचे आवाहन करुन वाहतुक शाखेच्या पोलीसांनी सुरक्षित व सुरक्षित रहदारीकडे लक्ष देण्याची सुचना केल्या. आमदार किशोर पाटील यांच्या जनहित रक्षणाच्या आदेशाची पोनि श्याम सोमवंशी यांनी तात्काळ अंमल बजावणीकरुन सार्वजनिक बांधकाम विभागास पोलीस बंदोबस्तात निष्पापांचे जिवघेण्या जारगांव चौफुलीपासून सकाळी 10 वाजे पासून अतिक्रमण काढण्याचा श्रीगणेशा केला. अचानक सुरु झालेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे या भागातील अतिक्रमण धारकांची पाचावर धारण बसून एकच धावपळ सुरु झाली. आमदार किशोर पाटील यांनी राजकारणाची काळजी न करता जनतेची जीवीत व वित्त हानी टाळण्यासाठी शहरातील व जनतेस त्रास दायक ठरणारे अतिक्रमण हटविण्याच्या घेतलेल्या धाडशी निर्णयाचे शहरातून स्वागत होत आहे. जनरक्षणासाठी जनतेने सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. पोलीस बंदोबस्तात निद्रावस्थेतील सार्वजनिक बांधकाम विभागाने हायवे रस्त्यालगतचे सर्व अतिक्रमण हटविण्याचा निर्धार केला आहे. हाच निकष व नियम शहरात सर्वच भागात व मुख्य रस्त्यांच्या दोन्ही बाजुस वाढलेल्या अतिक्रमणाला लागू होणार असल्याच्या हालचाली नगर पालिका प्रशासनाकडून होणार असल्याचे संकेत मिळत असून सोमवार किंवा मंगळवार पासून रहदारीच्या रस्त्यांवर व कडेला असणार्‍या अतिक्रमणांवर कार्यवाहीचा हतोडा चालू शकतो. या कार्यवाहीत न. पा. प्रशासनाने कठोर भुमिका घेण्याची गरज असून गरीबांना व श्रीमंताच्या अतिक्रमणाला समान न्याय दिला पाहीजे.

पाचोरा नगरीत दमदार फौजदार
पाचोरा नगरीला तत्कालीन स.पो निरिक्षक वाय.डी.पाटील, आर.डी.शिंदे, विलास जाधव या कर्तव्यदक्ष व कठोर शासक पोलीस अधिकार्‍यांनंतर सुमारे 20 ते 25 वर्षांनंतर श्याम सोमवंशी नावाचा दमदार फौजदार लाभला आहे. गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून सोमवंशी यांची जिल्हात ख्याती आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेत उपविभागीय पोलीस अधिकारी पातोंड यांच्या मार्गदर्शनात पो.नि.श्याम सोमवंशी तर सर्व बांधकाम विभागाचे बोंन्द्रे, बि.डी.ओ. गणेश चौधरी, तहसिलदार बि.ए.कापसे, मुख्याधिकारी किरण देशमुख, नितीन सुर्यवंशी, गजकाळे, प्रकाश पाटील, यशवंत घोरसे, राहूल बेहरे, किशोर पाटील, सचिन पाटील, अमृत पाटील, आर.सी.पी.चे 18 जवानांसह न.पा.आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, अनिल पाटील, राजू कंडारे, बापू ब्राम्हणे, देविदास देहडे, सुनिल चव्हाण, निळकंठ ब्राम्हणे सहकार्य करीत आहे.