पाचोरा शहरातून अल्पवयीन मुलीला पळविले ; अज्ञाताविरोधात गुन्हा

पाचोरा : तालुक्यातील एका शहरात राहणार्‍या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीला पाचोरा शहरातील एका शाळेच्या गेटवरून अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तरुणीला फुस लावत पळवून नेले
पाचोरा तालुक्यातील एका खेडे गावात राहते. अल्पवयीन मुलगी पाचोरा शहरातील एका शाळेत शिकायला आहे. शुक्रवार, 10 डिसेंबर रोजी दुपारी मुलगी शाळेत गेली होती. दुपारी 2 ते 3 वाजेच्या दरम्यान शाळेत गेटवर उभी असताना अज्ञात व्यक्तीने तिला फूस लावून पळवून नेले. अल्पवयीन मुलीच्या वडीलांच्या खबरीवरून पाचोरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार कैलास पाटील करीत आहे.