Fire at Dulhan Emporium in Pachora : Loss of Rs 10 lakh पाचोरा : शहरातील सु.भा.पाटील कॉम्प्लेक्समधील दुल्हन एम्पोरीयम या दुकानाला अचानक रविवारी रात्री 10.30 वाजेच्या सुामारास आग लागल्याने व्यापारीवर्गात खळबळ उडाली. वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आल्याने अन्य दुकानांना सुदैवाने आगीची झळ बसली नाही तर या आगीत सुमारे दहा लाखांवर नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.
रात्रीच्या सुमारास लागली आग
पाचोरा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सु. भा. पाटील कॉम्प्लेक्समधील दुल्हन एम्पोरीयमला रविवार. 13 नोव्हेंबर रोजी रात्रीच् 10:30 वाजेच्या सुमारास आग लागली. ही बाब दिनेश जैन यांनी दुकानाचे चालक पिंकी राहुल जैन यांना भ्रमणध्वनीद्वारे कळवल्यानंतर त्यांनी धाव घेत
अग्निशमन दलास पाचारण केले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले मात्र तो पर्यंत संपूर्ण दुकान जळुन खाक झाले. या आगीत सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज दुल्हन एम्पोरियमचे संचालक पिंकी राहुल जैन यांनी वर्तवला. सुदैवाने या आगीत जीवीतहानी टळली तसेच अन्य दुकानांना आगीची झळ बसली नाही. नसुन शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.