पाचोरा शहर हगणदारीमुक्त घोषित

0

पाचोरा । शासनाच्या महत्वाकांक्षी उपक्रमांपैकी एक उपक्रम स्वच्छ भारत अभियान हे आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत देश हगणदारीमुक्त करण्याचा संकल्प शासनाने केला आहे. त्यासाठी शासनस्तरावर उपाययोजना केल्या जात आहे. जिल्ह्याला शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. जिल्ह्याचे उद्दिष्ट पुर्तीकडे वाटचाल सुरु असून जिल्ह्यातील अनेक तालुके हगणदारीमुक्त घोषीत झाले आहे. दरम्यान पाचोरा नगरपरिषदेची स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत केंद्रस्तरीय समितीने 31 मे रोजी भेट दिली होती. समितीने अहवाल पाठविले असून पाचोरा शहर हगणदारीमुक्त घोषीत झाले आहे. शहर हगणदारीमुक्त करण्यासाठी नगरपालिकेतर्फे विविध उपाययोजन करण्यात आल्या. नवी दिल्ली येथील गुणनियंत्रण विभागाच्या कृष्णा मिश्रा व धमेंद्र पांडे यांनी पाचोरा शहराची पाहणी केली.

दीड कोटी बक्षीस
शासनाने शौचालय बांधकामाची योजना अग्रस्थानी घेतली आहे. जिल्ह्याच वाटचाल उद्दिष्ट पुर्ततेकडे आहे. गाव हगणदारीमुक्त व्हावे यासाठी शासनातर्फे बक्षीस व पारितोषीक घोषीत करण्यात आले आहे. पाचोरा शहरा हगणदारीमुक्त घोषीत झाल्याने शासनाकडून दीड कोटी रुपयाचे बक्षीस मिळणार आहे. बक्षीस स्वरुपात मिळालेल्या रकमेचा वापर शहराच्या विकासकामासाठी होणार आहे.

1006 शौचालयाचा वापर
पाचोरा नगरपालिका हद्दीत एकूण 1 हजार 33 कुटूंबांकडे शौचालये नव्हती. पाचोरा नगरपरिषदेने योजनेअंतर्गत 1 हजार 392 कुटूंब पात्र ठरवून अनुदानाचा पहिला हफ्ता वितरीत केलेला आहे. बांधकामाचे प्रत्येक टप्प्यानूसार अनुदानाचे वाटप करण्यात येत आहे. शहरात अद्यापर्यत 1006 शौचालांचे बांधकाम पुर्ण होऊन त्यांचा वापर सुरु झालेला असल्याचे पाहणीतुन दिसून आले.

यांची होती उपस्थिती
मुख्याधिकारी किरण देशमुख, प्रशासकीय अधिकारी प्रकाश भोसले, आरोग्य निरीक्षक धनराज पाटील , नगरसेवक सतीश चेडे, मनीष भोसले, महेश सोमवंशी, विकास पाटील, अमोल चौधरी, संजय धमाळ, ललित सोनार, भिकन गायकवाड, अशपाक देशमुख , दत्तात्रय पाटील, किशोर मराठे, सुरेश पाटील, देवीदास देहाडे बापू ब्राम्हणे, विनोद सोनवणे, नीलकंठ ब्राम्हणे, प्रवीण ब्राम्हणे आदी उपस्थित होते.

या भागाची केली पाहणी
कुटुंबाना शासकीय योजने अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी पहिला हप्ता दिला होता. 31 म ेरोजी शहराची पाहणी केली यात शाळा कॉलेज रेल्वे स्टेशन बस स्टँड, वंजारवाडी, स्मशानभूमी परिसर, गौडवस्ती, संभाजीनगर साम्राट अशोकनगर आठवडे बाजार या ठिकाणी पाहणी केली तसेच वैयक्तिक शौचालय तपासले. ओ.डी.स्पॉट व ओपन जीम्स, बॅचेस ठेवून खुल्या जागा नगर पालिकाकायम स्वरुपी उपयोगात आणणार आहेत. शौचालाय नव्हते, सव्र्हेक्षनांनंतर 1500 कुटुंबाकडे वैयक्तिक शौचालये आढळले नाही.