पाचोरा स्टेट बँकेसमोर भीक मांगो आंदोलन

0

पाचोरा । स्टेट बँकेतील विविध सुविधांचा अभाव आणि व्यस्थापकांच्या मनमानी कारभाराविरोधात शुक्रवारी काँग्रेसतर्फे पाचोरा येथे भीक मांगो आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी 21 रोजी स्टेट बँकेच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. स्टेट बँकेचे व्यवस्थापक रणजीत कुमार यांच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच विविध नऊ मागण्यांसाठी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे जिल्हा ग्रामीणचे मुख्य संयोजक सचिन सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.

5 एप्रिल रोजी क्षेत्रीय व्यवस्थापक जळगाव यांना तक्रार अर्ज देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. यावेळी सचिन सोमवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. व्यवस्थापक रणजित कुमार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांसंदर्भात केलेल्या कार्यवाहीचे पत्र दिले. यावेळी दत्ता बोरसे, दिनेश बोथरा, नंदू सोनार, अविनाश भालेराव, जीवन जैन, नितीन टिल्लू , अभिलाष बोरकर आदी उपस्थित होते.