पाचोरा : 34 वर्षीय अविवाहित युवकाचा टेबल फॅनचा शॉक लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवार, 14 जुलै रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीपक संतोष महाजन (34, श्रीराम चौक, पाचोरा) असे मयताचे नाव आहे.
शॉक लागल्याने मृत्यू
डगाव रोडवरील चंद्रलोक चायनीज अॅण्ड पावभाजी सेंटरमध्ये आचारीचे काम करणारा दीपक महाजन बुधवार, 13 जुलै रोजी दैनंदिन काम आटोपून श्रीराम चौकात वास्तव्यास असलेल्या खोलीमध्ये गेला. गुरुवार, 14 जुलै रोजी दीपक हा हॉटेल वर कामास न आल्याचे मालकास कळाल्यानंतर मालकाने दीपकच्या खोलीवर जावुन चौकशी करण्याचा प्रयत्न केला. मात्र खोलीचा दरवाजा आतुन बंद होता. हॉटेल मालकाने इतरांच्या मदतीने दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दीपक हा निपचित पडलेल्या अवस्थेत व त्याचा हात हा खोली मधील टेबल फॅनला आवळलेल्या स्थितीत आढळून आल्याने दीपक यास तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी दीपक यास मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.