पाचोरा (प्रतिनिधी) – मराठा समाजाच्या वतीने मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यासाठी रस्त्यावर उभ्या असलेल्या पदाधिकारी यांना ताब्यात घेतले होते
मराठा समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात मराठा क्रांती मोर्चा ने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यासाठी सनदशीर मार्गाने भडगाव रस्त्यावरील एका चौकात मराठा क्रांती मोर्चा चे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली उभे असतांनाच पो. नि. राहुल खताळ यांनी ताब्यात घेतले यावेळी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देण्यात आल्या. पहील्यांदाच मराठा आंदोलकांवर १४९ ची नोटीस बजावण्यात आली यामुळे सरकार चा निषेध करुन सरकार हमसे डरती है पोलिस को आगे करती है या घोषणा देण्यात आल्या. मराठा आंदोलकांवर केलेल्या कारवाईचा निषेध करण्यात आला तर पोलीस ठाण्यात ठीय्या मांडला गेला होता. यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक सचिन सोमवंशी यांनी म्हटले की घटनेच्या मुलभूत अधिकार असलेल्याने आम्ही सनदशीर मार्गाने आंदोलन करणार होतो पहील्यांदाच पाचोरा तालुक्यातील सत्ताधारी यांच्या दडपशाही मुळे पोलीस बळाचा वापर करून आंदोलन होवु दिले नाही. निवेदन देवु दिले नाही.. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्वतः ला मराठा म्हणवता आणि ज्या समाजाच्या जिवावर मोठे होतात त्याच समाजाचा आवाज दडपतात ही हुकुमशाही वृत्ती चा मी निषेध करतो. तमाम मराठा बांधवा या घटनेचा गांभीर्याने विचार करतीलच आणि येणाऱ्या काळात याचा हीशोब द्यावा लागेल. पाचोरा तालुक्यातील मराठा आंदोलनाला पहील्यांदाच पोलीस बळाचा वापर केल्याचा निषेध करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चा च्या निवेदनात गोंडगाव ता भडगाव येथील कु. कल्याणी चा अत्याचार करुन निघृण खुन करण्यात आला हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविला गेला पाहिजे… जालना जिल्ह्य़ातील अंतरवली सराटी येथे मराठा माता भगिनी सह बांधवांवर जो अत्याचार झाला या घटनेच्या दोषी अधिकाऱ्यांवर व कर्मचारी यांच्या वर कारवाई करण्यात यावी, मराठा माता भगिनींना अश्लील शिवीगाळ करणारा जळगाव जिल्ह्य़ातील तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना बडतर्फ करुन तात्काळ अटक करावी, जरांगे पाटील यांचे उपोषण तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण तात्काळ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा आणि राज्यसभा ची निवड लागण्याच्या आधी द्यावे अशा मागण्यांचे निवेदन देण्यात येणार होते मात्र सनदशीर मार्गाने आंदोलन करु दिले गेले नाही.. पाचोरा पोलिस ठाण्यात तब्बल चार तास हुन अधिक वेळ आंदोलक यांना बसवून ठेवले यावेळी वामन पाटील,विठ्ठल गुंजाळ, राहुल शिंदे, नाना पाटील, संतोष पाटील, कल्पेश येवले, रवी सुरवाडे, इरफान मनियार, बंडु पाटील, शिवाजी पाटील, मुकेश पाटील, निलेश पाटील, संदीप पाटील,मराठा सेवा संघाचे अध्यक्ष सुनील पाटील, संभाजी ब्रिगेड चे गणेश पाटील, मुकेश तुपे आदी उपस्थित होते.