शहरातील परिसर सील
पाचोरा:येथील 92 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्या रुग्णाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव आला. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबातील 13 जणांना जळगाव येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तसेच नगरपालिका चौक प्रकाश टॉकीज, स्टेट बँक परिसर, सुपडू भादू शाळा परिसर हा सिल करण्यात आलेला आहे. तर चाळीस जणांना पाचोरा शहरातील रुग्णालयात आयसोलेटेड करण्यात आले आहे.