पाचोरा :- शहरातील एका भागातील आठ वर्षीय अल्पवयीन बालिकेवर 18 वर्षीय तरुणाने अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्याने शहरात खळबळ उडाली. बुधवारी दुपारी ही घटना घडली. या प्रकारानंतर बालिकेने आरडा-ओरड केल्याने नातेवाईक जमल्याने आरोपीने पळ काढला तर पोलिसांना या प्रकाराची माहिती दिल्यानंतर संशयीत आरोपी भैय्या भरत गायकवाड (18) यास ताब्यात घेण्यात आले. पीडीत बालिकेला वैद्यकीय तपासणीसाठी जळगाव येथे नेण्यात आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या गुन्ह्याचा आम्ही बारकाईने तपास करीत असून संशयीत आरोपीला आम्ही ताब्यात घेतल्याचे पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांनी सांगितले.